IPL Points Table: लखनौ-मुंबई सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या संघाला किती आहेत गुण

सध्या गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर असून त्याचे 12 गुण आहेत. याशिवाय मुंबईच्या (Mumbai Indians) संघाचे खातेही अद्याप उघडलेले नाही आणि मुंबई इंडियन्स 0 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे.

IPL Points Table: लखनौ-मुंबई सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या संघाला किती आहेत गुण
लखनौ-मुंबई सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदलImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 2:23 PM

मुंबई – आयपीएलमधील प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट टेबलची (IPL Points Table) स्थिती बदलते. आयपीएलचा (IPL 2022) हा मोसम रोमांचक टप्प्यावर पोहोचला असून सर्व संघ आता प्लेऑफसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. सलग आठ सामने गमावून मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. अजूनही 9 संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर असून त्याचे 12 गुण आहेत. याशिवाय मुंबईच्या (Mumbai Indians) संघाचे खातेही अद्याप उघडलेले नाही आणि मुंबई इंडियन्स 0 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे. कालच्या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये काय स्थिती आहे आपण पाहू या.

time table

जाणून घ्या कोणत्या संघाला किती आहेत गुण

  1. गुजरात टायटन्सचा संघ 7 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याच्या संघाचे सर्वाधिक 12 गुण आहेत.
  2. सनरायझर्स हैदराबाद संघाने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून संघाचे 10 गुण आहेत. सध्या गुणतालिकेत हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  3. राजस्थान रॉयल्सनेही 7 पैकी 5 सामने जिंकून 10 गुण मिळवले असून संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  4. मुंबईविरुद्ध शानदार विजय नोंदवल्यानंतर लखनौचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनौने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुण मिळवले आहेत.
  5. आरसीबी संघाने आतापर्यंत 8 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुणांसह संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
  6. दिल्ली कॅपिटल्सची स्थिती चांगली नाही आणि संघाने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले असून 6 गुणांसह दिल्लीचा संघ सध्या 6 व्या क्रमांकावर आहे.
  7. कोलकाता नाईट रायडर्स कठीण स्थितीत पोहोचले असून त्यांनी आतापर्यंत 8 सामन्यांपैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. केकेआर 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
  8. पंजाब किंग्जचे 6 गुण आहेत आणि पंजाब गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये केवळ 3 सामने जिंकता आले आहेत.
  9. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जची अवस्था तर आणखी वाईट आहे. चेन्नईने आतापर्यंत 7 पैकी केवळ 2 सामने जिंकले असून 4 गुणांसह संघ नवव्या क्रमांकावर आहे.
  10. या मोसमात मुंबई इंडियन्सने अद्याप आपले खाते उघडलेले नाही आणि संघाने सर्व आठ सामने गमावले आहेत. मुंबईचे सध्या 0 गुण आहेत आणि संघ तळाच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.