भारतीय क्रिकेट संघाचा मोठा निर्णय, टीम इंडियानं अचानक जर्सी बदलली, समोर आलं मोठं कारण
भारतीय क्रिकेट टीमनं पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली आहे. ऑस्ट्रेलियानं या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाचा पराभव केला.
भारतीय क्रिकेट टीमनं पहिल्यांदाच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली आहे. ऑस्ट्रेलियानं या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाचा पराभव केला. तब्बल दहा वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचं टीम ऑस्ट्रेलियाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.तिसऱ्या दिवशीच सिडनी टेस्टचा निकाल लागला.शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं संघात काही बदल केले होते. रोहित शर्मा या सामन्यात खेळला नाही, त्यामुळे जसप्रीत बुमराह याच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती.मात्र सामना सुरू असतानाच तो मध्येच जखमी झाला, त्यानंतर टीमची सूत्रं विराट कोहलीच्या हाती आले.तर शुभमन गिल यांचं देखील पुनरागमन झालं.
हे सर्व बदल सुरू असतानाच टीम इंडियानं आणखी एक मोठा बदल केला, तो म्हणजे या सामन्यात टीम इंडियांच्या खेळाडूंनी आपली जर्सी देखील बदलली होती. सिडनी टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंनी जी जर्सी घातली त्या जर्सीवर नेहमीप्रमाणे खेळाडूचं नाव आणि नंबर हा निळ्या रंगात नव्हता. तर तो गुलाबी रंगात होता. जाणून घेऊयात यामागे नेमकं काय कारण होतं?
टीम इंडियानं जर्सी का बदलली?
एका खास मोहिमेला सपोर्ट करण्यासाठी भारतीय टीमने हा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकेग्रा याच्या दिवंगत पत्नीच्या आठवणीमध्ये ऑस्ट्रेलियन टीम प्रत्येक वर्षाची पहिली कसोटी ही पिंक टेस्टच्या रुपात खेळते.2008 मध्ये त्याच्या पत्नीच निधन झालं होतं. हा नव्या वर्षातील पहिलाच कसोटी सामना असल्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम देखील गुलाबी जर्सीमध्ये सामना खेळताना दिसून आली, टीम इंडियानं देखील या मोहिमेला सपोर्ट करण्यासाठी आपल्या जर्सीमध्ये बदल केला होता. टीम इंडियानं जी जर्सी घातली होती, त्या जर्सीवर नेहमीप्रमाणे खेळाडूचं नाव आणि नंबर निळ्या अक्षरात नव्हतं तर ते गुलाबी अक्षरात होतं. ऑस्ट्रेलियन सांघानं देखील अशीच जर्सी घातली होती, ज्यामध्ये खेळाडूचं नाव आणि नंबर हा गुलाबी अक्षरात होता. भारतानं पहिल्यांदाच ही ट्रॉफी गमावली आहे. खेळाडूच्या खराब कामगिरीचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.