IPL 2023मध्ये होणार मोठा बदल, टॉसनंतरही कर्णधार घेऊ शकतो सामना पलटवणारा निर्णय

आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू व्हायला काही दिवसांचा अवधी राहिला आहे. आयपीएल सुरू होण्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

IPL 2023मध्ये होणार मोठा बदल, टॉसनंतरही कर्णधार घेऊ शकतो सामना पलटवणारा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 7:49 PM

मुंबई : आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू व्हायला काही दिवसांचा अवधी राहिला आहे. आयपीएल सुरू होण्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. यंदाच्या मोसमामध्ये एक नवीन नियम बदलणार आहे. IPL चा नवा नियम प्लेइंग इलेव्हनबाबत आहे. हा नियम पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हा नियमच तसाच काहीसा आहे.

काय आहे नवीन नियम-

आयपीएलमध्ये टॉसनंतर कर्णधार आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. सामन्यावेळी दोन्ही कर्णधारांना एक शीट आणावी लागणार आहे आणि ज्यावेळी टॉस होईल त्यावेळी त्यांना संघात जो काही बदल करायचा आहे तो करून ते शीट एकमेकांना द्यावं लागणार आहे.

याआधी दोन्ही संघांना सामना सूरू होण्याआधी अंतिम अकरा खेळाडूंची यादी दोन्ही संघाच्या कर्णधारांना द्यावी लागत होती. या नियमानुसार आता टॉस झाल्यावर दोन्ही संघाना हवा तो बदल करता येणार आहे. याबाबत क्रिकइन्फोवर माहिती देण्यात आली आहे मात्र बीसीसीआयने याबाबत अधिकृत अशी घोषणा केलेली नाही. हा नियम आधी दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये लागू करण्यात आला होता. या निर्णयाचा परिणाम असा होणार आहे की यामुळे आता सामन्याच्या निकालावर टॉसचा काही परिणाम होणार नाही. बीसीसीआयकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नसले तरी बीसीसीआय कडून  याची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. आगामी हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी देशभरातील 12 स्टेडियममध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.