छोट्या टीमचा मोठा धमाका, फक्त 7 धावांनी जिंकला सामना
Bangladesh Cricket Team : बांग्लादेशाच्या संघानं असं काही केलंय की ही किमया मोठं मोठ्या संघांनाही करता आलेली नाही.
नवी दिल्ली : क्रिकेटचं (Cricket) मैदान म्हटलं की सराव करावाच लागणार. त्याशिवाय तुम्हाला कोणताही सामना जिंकणं जवळपास अशक्यच आहे. आपण हे मागच्या काही सामन्यांवरुन पाहू शकतो. आयपीएल (IPL 2022), आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 (T20) सीरिजमध्येही त्याचा प्रत्येय आला. अनेक खेळाडू आयपीएलमध्ये चांगले खेळले. जे चांगली खेळले नाही. त्यांनी सरावाच्या जोरावर आशिया चषकात आपली कामगिरी दाखवली. त्यात विराट कोहलीचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. आपल्या सरावाच्या जोरावर बांग्लादेशच्या संघानं (Bangladesh Cricket Team) अशीच एक किमया केली आहे.
हे ट्विट पाहा
Bangladesh tour of United Arab Emirates: 1st T20I – Bangladesh won by 7 runs and lead the series by 1-0.#BCB | #UAEvBAN | #Cricket pic.twitter.com/Y4MHEcvd61
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 25, 2022
सामन्यात काय झालं?
बांग्लादेशानं आधी फलंदाजी करताना पाच विकेट, 158 धावा बनवल्या. या लक्षाचा पाठलाग करताना संयुक्त अरब अमिरातच्या संघानं 19.4 ओव्हरमध्ये 151 धावांवर सर्वबाद झाले. यामुळे बंग्लादेश संघ विजयी झाला. यावेळी महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी सात-सात धावांंनीच प्रतिस्पर्धी संघाला हरवलंय.
हे ट्विट पाहा
ICC Women’s T20 World Cup Qualifier Final: Bangladesh Women’s team won by 7 runs.#BCB | #BANvIRE | #IWC pic.twitter.com/ZblwM9Fsh0
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 25, 2022
अफीफच्या सर्वाधिक धावा
यावेळी बांग्लादेशाकडून सर्वाधिक 77 धावा या अफीफ हुसैन यानं बनवल्या आहेत. अफीफनं 55 बॉलमध्ये सात चौकार आणि तीन षटकार लगावत मैदानाकडे लक्ष वेधलं. यावेळी त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसलं.
यापूर्वीही हरवलं
यापूर्वी देखील यूएईला हरवण्यात आलं होतं. बांग्लादेशाच्या पुरुष क्रिकेट संघानं यूएईला दुबई खेळवल्या गेलेल्या सीरिज आधी टी-20 सामन्यात हरवलं होतं.
या दोन्ही संघात एक महत्वाची गोष्ट आणि आश्चर्य वाटणारी गोष्ट ही होती की, बांग्लादेशच्य पुरुष आणि महिला, अशा दोन्ही क्रिकेट संघांनी यूएईमध्ये हा सामना खेळवलाय. एकाच वेळी त्यांनी हे काम केलंय. यामुळे या टीमचं सर्वत्र कौतुक होतंय.