सायमड्सच्या अपघाती मृत्यूनंतर समोर आली मोठी आठवण! शेन वॉर्नचाही झालेला Bike Accident, पण…
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा असाच मोटारसायकल अपघात झाला होता.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं (Andrew Symonds Death) रस्ते अपघातात निधन झालं. सायमंड्सच्या अकाली निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. अँड्र्यू सायमंड्सचं क्रिकेट खेळायचा, त्यावेळी त्याची सर्वोत्तम ऑलराऊंडर्समध्ये (All rounder) गणना व्हायची. सायमंड्स त्या तीन ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूंपैकी आहे, ज्यांनी 5 हजार पेक्षा जास्त धावा आणि 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या. क्वीन्सलँडमधील एलिस रिव्हर ब्रिजजवळच्या हरवे रेंज रोडवर अँड्र्यू सायमंड्सच्या गाडीचा अपघात झाला. सायमंड्सची कार रस्ता सोडून पलटी झाली. पोलिसांनी ही माहिती दिली. सायमंड्सचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. अपघातानंतर दोन मिनिटांनी तिने सायमंड्सला कारमध्ये बघितलं. दरम्यान, सायमड्सच्या अपघाती मृत्यूनंतर एक आठवण समोर आली आहे. शेन वॉर्नरचाही असाच अपघात (Bike Accident) झाला होता. आजही त्या आठवणी ताज्या आहेत.
वॉर्नरची आठवण
अँड्र्यू सायमंड्सच्या अपघाती मृत्यूनंतर अशी एक मोठी आठवण समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा असाच मोटारसायकल अपघात झाला होता. वॉर्नचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक चालवत असताना तो खाली पडला आणि 15 मीटरपेक्षा जास्त घसरत गेला, असं सिडनी मॉर्निंग हेराल्डने न्यूज कॉर्पच्या हवाल्यानं त्यावेळी म्हटलं होतं.ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न मोटारसायकल अपघातात जखमी झाला होता. यावेळी अनेकांनी तो असलेल्या रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी त्याची एक प्रतिक्रिया समोर आली. वॉर्नंर म्हणाला की, ‘मला थोडा मार लागला आहे आणि जखमा झालो आहे. खूप दुखले आहे,’ मात्र, वॉर्नने गंभीर दुखापतीमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तो वेदनांनी कायमचा आपल्यातून निघून गेला होता.
सायमंड्सला पाठिवर घेतलं
सायमंड्सचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याची नाडी बंद होती. “माझ्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने सायमंड्सला कार बाहेर काढलं. स्वत:च्या पाठीवर ठेवलं. तो बेशुद्ध होता. काही प्रतिसाद देत नव्हता. नाडी चालू नव्हती” असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. सायमंड्स दारुच्या नशेत असल्याचे कुठलेही संकेत नाहीत, असं पोलीस निरीक्षकाने सांगितलं. पॅरामेडीकलची टीम आली, त्यावेळी स्थानिक रहिवाशी आसपास जमले होते. स्थानिकांनी त्यांना शक्य असलेली सर्व मदत केली व आपातकालीन सेवेशी लगेच संपर्क साधला. यावर्षी अकाली निधन झालेला अँड्र्यू सायमंड्स ऑस्ट्रेलियाचा तिसरा क्रिकेटपटू आहे. काही महिन्यांपूर्वी शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांचं निधन झालं होतं. अँड्र्यू सायमंड्स क्रिकेट बरोबरच अनेकदा वादांमुळेही चर्चेत राहिला आहे. हरभजन आणि त्याच्यामधलं मंकी गेट प्रकरण बरच गाजलं होतं.