IND vs WI T20 : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात मोठी चूक, संघ मैदानात उतरला खरा पण…

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी20 सामन्यात मोठी चूक समोर आली. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर भारतीय संघ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरला पण परत जावं लागलं.

IND vs WI T20 : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज  सामन्यात मोठी चूक, संघ मैदानात उतरला खरा पण...
IND vs WI T20 : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्यात पहिल्यांदाच घडलं असं काही, संघाला परत जावं लागलं पॅव्हेलियनमध्ये
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 10:52 PM

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या तिसऱ्या टी20 सामना सुरु आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना काहीही करून भारताला जिंकावा लागणार आहे. अन्यथा मालिका हातून गमवावी लागू शकते. त्यामुळे हा सामना किती महत्त्वाचा आहे लक्षात येतं. असं असताना नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर एक मोठी चूक पंचांच्या लक्षात आली आणि क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या भारतीय संघाला पुन्हा मैदानात परतावं लागलं. 30 यार्ड सर्कलमध्ये चूक झाल्याचं पंचांनी पाहिलं आणि सामना सुरू होण्यासाठी उशीर झाला. गयाना प्रोव्हिडेंस मैदानात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरु होणं गरजेचं होतं. पण हा सामना काही मिनिटं उशिराने सुरु झाला.

नेमकं कसं आलं लक्षात

सामना सुरु होण्याच्या काही मिनिटांआधी दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले होते. भारतीय संघाने क्षेत्ररक्षण लावण्यास सुरुवात केली होती. तर वेस्ट इंडिजचे सलामीचे फलंदाज मैदानात उभे होते. नेमकं तेव्हाच पंचाच्या ही चूक लक्षात आली. सामन्यासाठी पिचपासून 30 यार्डपर्यंत एक वर्तुळ आखलं जातं. पॉवरप्ले दरम्यान खेळाडूंसाठी एक लक्ष्मण रेषा असते असं म्हणायला हरकत नाही. पण ग्राउंड स्टाफ ही आखणं विसरून गेले. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

पंचांनी सर्व खेळाडूंना जाण्यास सांगितलं आणि ग्राउंड स्टाफला चूक सुधारण्यास सांगितलं. यामुळे सामना सुरु होण्यास काही मिनिटांचा अवधी लागला. यापूर्वी असाच काहीसा प्रकार पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्यात पाहायला मिळाला होता. रावलपिंडीमध्ये काही षटकं खेळल्यानंतर ही चूक लक्षात आली त्यानंतर सामना मध्येच थांबवून सर्कल दुरुस्त करण्यात आलं.

आर. अश्विनने उपस्थित केला प्रश्न

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने विंडीज क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. अश्विनने याबाबत एक ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘या कारणांमुळे तिथं जाणं वाटतं तितकं सोपं नसतं. एक क्रिकेटर म्हणून तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. तुम्हाला कायम या गोष्टींसाठी तयार राहावं लागेच ज्याची तुम्हाला कधी आशाच नसेल.’

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.