वनडे वर्ल्डकप जेतेपदाबाबत मोठा खुलासा, पंचाने रिटायरमेंटनंतर दिली चुकीची कबुली

वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धा पाच वर्षे उलटली आहे. मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील थरार कोणीही विसरू शकलेलं नाही. न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचले होते. अंतिम फेरीत चौकाराच्या आधारावर इंग्लंडला जेतेपद दिलं गेलं. मात्र आता पंचांनी एक खुलासा केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

वनडे वर्ल्डकप जेतेपदाबाबत मोठा खुलासा, पंचाने रिटायरमेंटनंतर दिली चुकीची कबुली
2019 वनडे वर्ल्डकप जेतेपदाचा खरा मानकरी कोण? पंचांच्या खुलाशानंतर एकच खळबळ
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 8:00 PM

वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धेतील अंतिम फेरीचा थरार अजूनही क्रीडाप्रेमींच्या लक्षात आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि इंग्लंड आमनेसामने आले होते. जेतेपदासाठी दोन्ही संघ पहिल्यांदा दावेदार ठरणार होते. मात्र अंतिम फेरीत कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि क्रिकेटच्या इतिहासात नव्या विजेत्याचं नाव कोरलं गेलं. हा सामना टाय झाला होता म्हणून सुपर ओव्हरमध्ये गेला. पण तिथेही सामना टाय झाल्याने चौकारांच्या आधारे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्याच्या अंतिम फेरीत पंच म्हणून मराइस इरास्मस आणि कुमार धर्मसेना होते. त्यांच्याकडून झालेली एक चूक न्यूझीलंडला महागात पडली आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. इरास्मम आता निवृत्त झाले आहेत आणि आता एक खुलासा केला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे.

इंग्लंड न्यूझीलंड सामन्यात ओव्हरथ्रो एक मोठा मुद्दा ठरला आहे. 50 व्या षटकात इंग्लंडला 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. ट्रेंट बोल्टच्या हाती षटक होतं. पहिल्या आणि दुसरा चेंडू ट्रेंट बोल्टने निर्धाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सने षटकार मारला. चौत्या चेंडूवर धाव ओव्हर थ्रो झाला आणि सहा धावा आल्या. हाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. मार्टिन गप्टिलने जोरात थ्रो केला आणि विकेटवर आदळण्यापूर्वी स्टोक्सच्या बॅटला लागून चौकार गेला. त्याचा फायदा इंग्लंडला झाला. पण नियमानुसार पाच धावा दिल्या पाहीजे होत्या. कारण फलंदाजांनी क्रिज पूर्णपणे क्रॉस केलं नव्हतं. मैदानावरील पंच कुमार धर्मसेना आणि मराइस इरास्मस यांनी चर्चा करून धावा दिल्या होत्या.

पंच मराइस इरास्मसने रिटायरमेंटनंतर सांगितल की, “सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्तासाठी मी हॉटेलचा दरवाजा खोलला आणि धर्मसेनाही तेव्हाच समोर आला. त्याने सांगितलं की आपण एक मोठी चूक केली आहे. त्यावेळेस आम्हाला आमची चूक लक्षात आली. मैदानात आम्ही त्या 6 धावा चर्चा करून दिल्या होत्या. पण फलंदाजांनी क्रॉस केलं नसल्याचं पाहिलं नाही. हा मुद्दा उचलला गेला नाही.”

दुसरीकडे आणखी एका चुकीची कबुली दिली आहे. “रॉस टेलरला चुकीचा एलबीडब्ल्यू दिलं होतं. हा चेंडू खूपर वर होता. त्यांनी रिव्ह्यू गमावला होता. पूर्ण सात आठवड्यात माझ्याकडून एकमात्र चुकी झाली. मला त्याचं खूप दु:ख होत आहे. यामुळे खेळावर परिणाम झाला. कारण रॉस टेलर एक टॉप खेळाडू होते.”

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.