सिक्सर किंग युवराज सिंगवर येणार बायोपिक, कोणता अभिनेता साकारणार भूमिका?

सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यावर बायोपिक आल्यानंतर युवराज सिंग या पंगतीत बसणार आहे. भूषण कुमार आणि रवि भागचंदका हे युवराज सिंगच्या चित्रपटाचे प्रोड्युसर असणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत आतापासून उत्सुकता लागून आहे.

सिक्सर किंग युवराज सिंगवर येणार बायोपिक, कोणता अभिनेता साकारणार भूमिका?
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 6:42 PM

रुपेरी पडद्यावर सिक्सर किंग युवराज सिंगचा बायोपिक लवकरच झळकणार आहे. यासाठी तयारी सुरु झाली असून भूषण कुमार आणि रवि भागचंदका या चित्रपटाचे प्रोड्युसर असतील. युवराज सिंग हा टी20 आणि वनडे वर्ल्डकपचा हिरो राहिला आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये युरवाज सिंगची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यात कँसरसारख्या आजाराशी लढा देत असताना वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळला. सर्व वेदना बाजूला ठेवून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची साथ दिली. युवराज सिंग वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. युवराज सिंगचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. एखाद्या चित्रपटाची हिरोसारखा..त्याच्या या कामगिरीची भूरळ चित्रपटसृष्टीला पडली आहे. बऱ्याच वर्षांनी युवराज सिंग चित्रपट करण्याचा विचार केला गेला आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना याबाबतची उत्सुकता आहे. युवराज सिंगच्या बायोपिकचं नाव काय असेल, युवराजची भूमिका कोण साकारणार? हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धा पार पडल्यानंतर युवराज सिंगला कँसर असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे भल्याभल्यांना धक्का बसला. मात्र या हिरोने त्या दुर्धर आजारावर मात केली आणि क्रिकेटच्या मैदानात परतला. तसेच आठवणीत राहतील अशा खेळी केल्या. त्यामुळे त्याच्यासोबत क्रिकेट मैदानात खेळलेले सुरेश रैना, हरभजन सिंग हे देखील उत्सुक आहेत. कारण युवराज सिंग संघात असला की मधल्या फळीचं टेन्शन नसायचं. तसेच एखादा गोलंदाज कमी पडला की जागाही युवराज सिंग भरून काढायचं. त्यामुळे त्याचं महत्त्व संघातील खेळाडूंना माहिती आहे.

View this post on Instagram

A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

युवराज सिंग 40 कसोटी सामने खेळला असून 3 शतकं आणि 11 अर्धशतकांच्या जोरावर 1900 धावा केल्या आहेत. तसेच 9 गडी बाद केले आहेत. 304 वनडे सामन्यात 14 शतकं आणि 52 अर्धशतकांच्या जोरावर 8701 धावा केल्या आहेत. तसेच 111 विकेट घेतल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 58 सामन्यात 8 अर्धशतकांच्या जोरावर 1177 धावा केल्या आहेत. तसेच 28 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 132 सामने खेळले असून 13 अर्धशतकं झळकावत 2750 धावा केल्या आहेत. तसेच 36 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून एक काळ गाजवला आहे. तसेच स्टूअर्ट ब्रॉडला मारलेले सलग 6 सिक्स कोणच विसरू शकत नाही.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.