Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविंद्र जडेजा याच्या चमकदार कामगिरीनंतर रिवाबाच्या वक्तव्याची एकच चर्चा, त्याने कायम…

क्रीडा वर्तुळात जडेजाच्या कामगिरीची जोरदार चर्चा आहे. अशातच रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने मोठं वक्तव्य केलं आहे.

रविंद्र जडेजा याच्या चमकदार कामगिरीनंतर रिवाबाच्या वक्तव्याची एकच चर्चा, त्याने कायम...
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 6:20 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चालू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने चमकदार कामगिरी केली. काही दिवस दुखापतीमुळे जडेजाला आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप या मोठ्या स्पर्धांना मुकावं लागलं होतं. रविंद्र जडेजाने कसोटीमध्ये विकेट्स घेत आणि अर्धशतकी खेळी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. दोन्ही डावात मिळून जडेजाने 10 विकेट्स घेतल्या होत्या. क्रीडा वर्तुळात जडेजाच्या कामगिरीची जोरदार चर्चा आहे. अशातच रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाली जडेजाची पत्नी?

मी सर्वात प्रथम टीम इंडियाचं अभिनंदन करते. दिल्लीतील कसोटी जिंकल्यावर पहिल्यांदाच क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने पहिलं स्थान मिळवलं आहे. रविंद्र जडेजाने संघामध्ये दुखापतीमधून संघासाठी केलेली कामिगिरी पाहून मला आनंद झाल्याचं रिवाबा जडेजाने म्हटलं आहे.

जडेजाने दुखापत झाल्यानंतर खूप दिवसांनी कमबॅक केलं होतं. कोणत्याही खेळाडूला कमबॅक करणं हे खूप मोठं आव्हान असतं. जडेजाने कमबॅक करताना केलेल्या चमकदार कामगिरीवर मी खूप खूश आहे. जडेजासाठी त्याचं पहिलं प्राधान्य कायम क्रिकेटला राहिलं असल्याचं रिवाबा म्हणाली. रिवाबाने जडेजाचं केलेल्या कौतुकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 ने टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. पहिल्या नागपूर कसोटीमध्ये जडेजाने 5 विकेट्स घेत अर्धशतकहीस केलं होतं. तर दुसऱ्या दिल्लीमध्ये झालेल्या सामन्यात जडेजाने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. तिसरा कसोटी सामना 1 ते 5 फेब्रुवारीदरम्यान मध्य प्रदेशमधील होळकर मैदानावर होणार आहे.

दरम्यान, रिवाबा जडेजा ही गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यावेळी जडेजा आपल्या पत्नीचा प्रचार करताना दिसला होता. दुखापतीमुळे बाहेर असलेला जडेजा पत्नीचा प्रचार करताना दिसल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकाही केली होती. या निवडणुकीमध्ये जडेजाच्या पत्नीने विजय मिळवला होता.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.