INDvsAUS : टीम इंडियाचा स्टार खेळाडू नागपूर टेस्टमधून आऊट?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्याआधी टीम इंडियसाठी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूला बाहेर वेटिंगवर रहावं लागू शकतो.
मुंबई : बॉर्डर गावसकर सीरिजमधील पहिला कसोटी सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये 9-13 फेब्रुवारीदरम्यान खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल पुनरागमन करतोय. मात्र केएल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोणती भूमिका निभावणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. या दरम्यान टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केएल राहुल याच्याबाबत मोठं विधान केलं आहे. रवी शास्त्री केएलबाबत नक्की काय म्हणाले आहेत, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
रवी शास्त्री काय म्हणाले?
शुबमन गिल याला केएल राहुलपेक्षा प्राधान्य द्याला हवं. उपकर्णधार म्हणजे टीममधील स्थान निश्चिती असं त्याचा अर्थ होऊ नये. शुबमन गिल चांगली कामगिरी करतोय. तसेच पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव याच्या आसपासही कुणीही नाही. त्यामुळे सूर्याला त्याच क्रमांकावर खेळवायला हवं, असं शास्त्री म्हणाले.
शुबमन आणि केएल या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची, हा निर्णय निवड समितीचा आहे. जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा प्रदर्शन निर्णायक ठरतं. मी नेट्स प्रॅक्टीसमध्ये गिल आणि केएल या दोघांना जवळून पाहिलंय. जर निर्णय घ्यायचा झालाच तर मी फुटवर्क आणि टायमिंग पाहतो. गिलला केएलपेक्षा प्राधान्य द्यायला हवं. तुम्हाला पाहायला हवं. पण मी हे नाही म्हणत की केएल उपकर्णधार असल्याने त्याची निवड निश्चितपणे होईल.
दरम्यान आता निवड समिती केएल राहुलला संधी देते की सातत्याने धमाकेदार कामगिरी करणाऱ्या शुबमनला संधी देतं, हे येत्या काही तासांमध्येच स्पष्ट होईल.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.