शेवटच्या षटकात 7 धावांची गरज, पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट! तरीही गोलंदाजावर फुटलं असं खापर Watch Video

क्रिकेट हा अनिश्चतेचा खेळ आहे. या खेळात कधी फासे पलटतील सांगता येत नाही. एखादा अचानक हिरोपासून विलेन बनतो. असंच काहीसं एका सामन्यात पाहायला मिळालं. शेवटच्या षटकात चार चेंडूंवर चार विकेट घेऊनही गोलंदाज विलेन ठरलं आहे.

शेवटच्या षटकात 7 धावांची गरज, पहिल्या 4 चेंडूत 4 विकेट! तरीही गोलंदाजावर फुटलं असं खापर Watch Video
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 5:16 PM

क्रिकेटमध्ये काही क्षण असा असतात की शेवटच्या चेंडूपर्यंत काय होईल सांगता येत नाही. अगदी लगान चित्रपट पाहताना ड्रामा, थ्रिलर सर्व काही अनुभवता येतं. विजयाचा घास तोंडातून खेचून आणण्याचे अनेक प्रसंग आतापर्यंत क्रीडाप्रेमींनी पाहिले असतील. असाच काहीसा प्रकार 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात पाहायला मिळाला. या सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. या सामन्यात एक गोलंदाज सुरुवातील हिरो झाला. मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला विलेन म्हणून पाहिलं गेलं. कारण या गोलंदाजाने पहिल्या चार चेंडूवर चार विकेट घेत विजयाच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. पण शेवटच्या दोन चेंडूत होत्याचं नव्हतं झाल. टी10 म्हणजेच दहा षटकांचा हा सामना होता. हा सामना केईल विरुद्ध आरसीसी यांच्यात रंगला होता. या सामन्यात आरसीसीने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 95 धावा केल्या आणि विजयासाठी 96 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना आरसीसी जबरदस्त खेळी. नवव्या षटकापर्यंत आरसीसीच्या 2 गडी बाद 88 धावा होत्या. त्यामुळे सहज विजय मिळेल असं वाटत होतं. शेवटचं षटक फर्नांडोच्या हाती सोपवलं.

शेवटच्या षटकात 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर 44 धावांवर खेळत असलेल्या कालुगमेजची विकेट काढली. दुसऱ्या चेंडूवर फलंदाजी आलेल्या फलंदाजाला खातंङी खोलू दिलं नाही. आला तसाच त्याला माघारी पाठवला. हॅटट्रीक चेंडूवर समराकडूनची विकेट काढली आणि जोरदार सेलीब्रेशन केलं. आता तीन चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर अहमदची विकेट काढली आणि चार चेंडूत चार विकेट घेण्याचा मान मिळवला. पाचव्या चेंडूवर रिलागोडगे याने एक धाव काढून 34 धावांवर खेळत असलेल्या नथ्थांडिगेला स्ट्राईक दिली. त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि संघाला विजय मिळवून दिला.

गोलंदाजाने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचून आणला होता. खरं तर शेवटच्या षटकात 7 धावांची गरज असताना सलग चार विकेट काढणं खूपच कठीण आहे. पण त्या गोलंदाजाचं दुर्दैव असं की पाचव्या चेंडूवर स्ट्राईक बदलली आणि तगड्या फलंदाजाला स्ट्राईक मिळाली. त्यामुळे होत्याचं नव्हतं झालं. शेवटच्या चेंडूवर षटकार मारून गोलंदाज खलनायक, तर फलंदाज नायक ठरला.

सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्
सुरेश धस यांनी केलेल्या 'त्या' आरोपांची थेट अजित दादांकडून पडताळणी अन्.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या दमानिया आता काय म्हणाल्या?.
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा
'हे ऑपरेशन टायगर नसून..', साळवींच्या शिवसेना प्रवेशावर अंधारेंचा निशणा.
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती
ठरलं तर..राजन साळवी उद्याच शिंदेंच्या शिवसेनेचं 'धनुष्यबाण' घेणार हाती.
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य
'सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड लवकरच...', चव्हाणांचं मिश्किल वक्तव्य.
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?
'छावा'च्यापूर्वी रश्मिका अन् विकी साईंच्या दरबारी, काय घातलं साकडं?.
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल
बीड पोलिसांना 3 महिन्यांनतर जाग; अखेर 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल.
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका
'...तर राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही', NCP च्या नेत्याची टीका.
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?
खलनायक, बिनडोक, शकुनी... शिरसाट राऊतांवर घसरले; काय केली जहरी टीका?.
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'
बीडच्या गुंडगिरीवर सुरेश धसांनी स्पष्टच सांगितलं, '...हे आमचं टार्गेट'.