AUS vs WI | विंडिजच्या ऐतिहासिक विजयानंतर ब्रायन लारा भावूक, व्हीडिओ व्हायरल
Brain Lara Emotional | वेस्टइंडिजच्य ऐतिहासिक आणि 27 वर्षांच्या विजयानंतर माजी कर्णधार ब्रायन लारा याला अश्रू अनावर झाले. यावेळेस एडम गिलख्रिस्ट याने लाराला शुभेच्छा देत कच्चून मीठी मारली.
ब्रिस्बेन | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. विंडिजच्या या विजयानंतर माजी कर्णधार आणि समालोचक ब्रायल लारा भावूक झाला. विंडिजच्या विजयानंतर लाराला आनंदाश्रू थांबवता आले नाहीत. तसेच यावेळेस सहकारी समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर एडम गिलख्रिस्ट याने लाराला मीठी मारत त्याचा आनंद द्विगुणित केला. लारा आणि गिलख्रिस्ट या दोघांचा कॉमेंट्री बॉक्समधील हा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शामर जोसेफ याने दुसऱ्या डावात घेतलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर विंडिजने हा ऐतिहासिक विजय मिळवला. जोसेफने जोश हेझलवूड याला क्लिन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केलं आणि सातवी विकेट मिळवली. विंडिज यासह ऑस्ट्रेलियात 27 वर्षांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरली. जोश हेझलवूड जसा क्लिन बोल्ड झाला, तसंच कॉमेंट्री बॉक्समध्ये ब्रायन लारा याच्या आनंदाचा पारावाच राहिला नाही.
लारा काय म्हणाला?
“वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी आजचा दिवस फार मोठा आहे. हा अविश्वसनीय असा विजय आहे. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्यासाठी आम्हाला 27 वर्ष लागली. हे या नव्या दमाच्या खेळाडूंनी करुन दाखवलंय. विंडिज क्रिकेट भक्कमपणे उभं आहे. आजचा दिवस आमच्यासाठी फार मोठा आहे. टीममधील प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन”, असं लारा म्हणाला.
दरम्यान ऑस्ट्रेलियाला टीम इंडियानंतर गाबामध्ये विंडिजकडून पराभूत व्हालं लागलं. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच डे नाईट सामन्यात पराभूत झाली. विंडिजने दुसऱ्या डावात 193 धावा करत 23 धावांच्या आघाडीसह कांगारुंना 216 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 बाद 60 धावा केल्या. मात्र शामर जोसेफ याच्या समोर कांगारुंनी नांग्या टाकल्या. विंडिजने अशाप्रकारे ऑस्ट्रेलियावर 1997 नंतर विजय मिळवला.
ब्रायन लारा भावूक
The 3 Kings…@gilly381 @BrianLara #Smithy ❤️ test cricket…@FoxCricket pic.twitter.com/rQBxho9z3B
— Mark Howard (@MarkHoward03) January 28, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शामर जोसेफ.