IPL 2021 | गेलचा झेल घेताना झाला ‘झोल’, बेन स्टोक्सवर आयपीएल 2021 सोडण्याची वेळ

बेन स्टोक्सचे बोट मोडल्यामुळे दुर्दैवाने त्याला आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे (Ben Stokes IPL 2021)

IPL 2021 | गेलचा झेल घेताना झाला 'झोल', बेन स्टोक्सवर आयपीएल 2021 सोडण्याची वेळ
बेन स्टोक्स कॅच घेताना जखमी
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 11:29 AM

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स (Ben Stokes) याला आयपीएल 2021 ( IPL 2021) मधून बाहेर पडावे लागत आहे. पंजाब किंग्जविरोधातील संघाच्या सलामीच्या सामन्यातच बेन स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला अलविदा म्हणावे लागत आहे. दहाव्या षटकात ख्रिस गेलचा (Chris Gayle) झेल पकडण्याच्या नादात मारलेली लांब उडी बेनला चांगलीच महागात पडली. (Broken finger rules Rajasthan Royals bowler Ben Stokes out of remainder of IPL 2021)

बिनीचा शिलेदार जायबंदी

“बेन स्टोक्सचे बोट मोडल्यामुळे दुर्दैवाने त्याला आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे. मात्र स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघासोबत ऑफ फील्ड राहून मदत करेल, अशी माहिती टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. बिनीचा शिलेदार जायबंदी झाल्यामुळे स्टोक्सची जागा कोण घेणार, याचा संघ व्यवस्थापन खल करत आहे. तर चाहत्यांचेही निर्णयाकडे डोळे लागले आहेत.

गेलचा कॅच घेताना स्टोक्सची ‘विकेट’

पंजाब किंग्जविरोधातील सामन्यात बेन स्टोक्सने आठ षटकांमध्ये गोलंदाजी केली. दहाव्या षटकात ख्रिस गेलचा (Chris Gayle) झेल पकडण्याच्या नादात स्टोक्सने लांब डाईव्ह घेतली, मात्र यावेळी त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. किंग्जनी 6 गडी गमावून 221 धावांचा डोंगर रचल्यानंतरही स्टोक्स मैदानात पुन्हा आला नाही. त्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून तो सलामीला उतरला. मात्र तीन चेंडूतच मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली आणि भोपळाही न फोडता त्याला तंबूत परतावे लागले.

स्टोक्सच्या इंज्युरीमुळे राजस्थान रॉयल्स संघाचे धाबे दणाणले आहेत. याचं कारण म्हणजे आधीच जोफ्रा आर्चर (Jofra Archer) जायबंदी आहे. तो सुरुवातीचे चार सामने खेळू न शकण्याची चिन्हं आहेत.

(Ben Stokes IPL 2021)

पंजाबचा राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी विजय

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना सोमवारी रात्री राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज (Rajasthan Royals vs punjab Kings) यांच्यात खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium Mumbai) खेळवण्यात आलेल्या थरारक सामन्यात पंजाबने राजस्थानवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने राजस्थानसमोर 221 धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने झंझावती शतक झळकावत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. परंतु शेवटच्या चेंडूवर संजूला षटकार ठोकता आला नाही, त्यामुळे हा सामना राजस्थानने गमावला.

संबंधित बातम्या :

IPL 2021 : 19 बॉलमध्ये 90 धावा ठोकल्या, तरीही मॅच गेली, सामन्यानंतर सॅमसन म्हणाला, ‘यापेक्षा मी अधिक काय करु शकत होतो…?’

IPL 2021 : ‘संजू…. तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’, मॉरिसच्या प्रश्नावर सॅमसनचं खास उत्तर

(Broken finger rules Rajasthan Royals bowler Ben Stokes out of remainder of IPL 2021)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.