Buchi Babu Trophy 2024: मुंबईचा मानहानीकारक पराभव, TNCA XI सेमी फायनलमध्ये
Buchi Babu Tournament 2024: सरफराज खान याच्या नेतृत्वात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीममध्ये एकसेएक खेळाडू असतानाही मुंबईला टीएनसीए 11 कडून 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलंय.
बुची बाबू 2024 स्पर्धेत मुंबईचा मानहानीकारक पराभव झाला आहे. टीएनसीए ईलेव्हनने मुंबईवर 286 धावांच्या फरकाने विजय मिळवला. मुंबईला विजयासाठी 510 धावांचं आव्हान मिळालं होतं. मुंबईचा डाव हा चौथ्या दिवशी या असंभव धावांचा पाठलाग करताना 223वर आटोपला. मुंबईकडून शम्स मुलानी याने 68 धावा केल्या.श्रेयस अय्यर आणि सरफराज खान हे दोघेही फ्लॉप ठरले. तर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे बॅटिंग करु शकला नाही. तर टीएनसीए ईलेव्हनकडून सी ए अच्युत आणि आर साई किशोर या दोघांनी 3-3 विकेट्स घेतल्या. टीएनसीए ईलेव्हनने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
श्रेयस सरफराजला अपयश
टीम इंडियाचा टी20i कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झालीय. त्यामुळे सूर्याला या सामन्यात बॅटिंग करता आली नाही. मात्र सूर्याची दुखापत किती गंभीर नाही, कारण तो सामन्यानंतर ठिकठाक दिसत होता. मात्र खबरदारी म्हणून सूर्याला विश्रांती करण्याचा सल्ला दिला गेला असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईने बिनबाद 6 धावांपासून खेळायला सुरुवात केली. मुशीर खान (40) आणि दिव्यांश सक्सेना (26) या दोघांनी 60 धावांची सलामी भागीदारी केली. सोनू यादवने ही जोडी फोडली. सोनूने दिव्यांशला आउट केलं. त्यानंतर एकाही जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही.
मुंबईकडून 2 जोडींनाच 40 पेक्षा अधिक धावांच्या भागीदारी करण्यात यश आलं. श्रेयस अय्यर (22) आणि सिद्धांतर आधातराव (28) या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. कॅप्टन सरफराज खान याला भोपळाही फोडता आला नाही. तर शम्स मुलानी (68) आणि मोहित अवस्थी (0*) या दोघांनी 46 धावांची भागीदारी केली.
मुंबईचा पराभव
TNCA XI and Chhattisgarh won against Mumbai and Baroda, respectively, and have qualified for the semi-finals in the ongoing Buchi Babu Invitation Cricket Tournament 2024-25. 🔥#BuchiBabuTournament #TamilNaduCricket #TNCA #TNCACricket pic.twitter.com/ZMUnuaWISU
— TNCA (@TNCACricket) August 30, 2024
4 डावांमधील धावसंख्या
टीएनसीए 11 ने पहिल्या डावात ऑलआऊट 379 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा डाव हा156 धावांवर आटोपला. त्यामुळे टीएनसीए 11 ला 223 धावांची आघाडी मिळाली. टीएनसीए 11 ने या आघाडीसह दुसर्या डावात 286 धावा केल्या. टीएनसीने अशाप्रकारे 509 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 510 धावांचं आव्हान मिळालं. मात्र मुंबईला 223 धावांपर्यंतच मजल मारता आली.