बुमराहने डाव्या हाताने गोलंदाजी करावी, पंतप्रधानांनी पाचव्या कसोटीपूर्वी व्यक्त केली इच्छा; कारण..

पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियात बरीच उलथापालथ झाली आहे. पाचव्या कसोटीत रोहित शर्माला बसवलं असून जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. असं असातना ऑस्ट्रेलिया जसप्रीत बुमराहसाठी एक कायदा करण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीजी यांनी ही मिश्किल वक्तव्य केलं आहे.

बुमराहने डाव्या हाताने गोलंदाजी करावी, पंतप्रधानांनी पाचव्या कसोटीपूर्वी व्यक्त केली इच्छा; कारण..
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 6:28 PM

ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहचा बोलबाला पाहायला मिळत आहे. चार सामन्यात जसप्रीत बुमराहने 12.83 च्या सरासरीने 30 विकेट घेतल्या आहेत. यात तीन वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. बुमराहच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पण दुसऱ्या बाजूला इतर गोलंदाज मात्र निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे सिडनी कसोटीतही बुमराहच्या गोलंदाजीवर भारताची मदार असणार आहे यात काही शंका नाही. असं असताना पाचव्या कसोटी सामन्यात बुमराह दुहेरी भूमिका बजावताना दिसणार आहे. कारण पाचव्या कसोटीत रोहित शर्माला आराम दिला जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणार आहे. पर्थ कसोटीत बुमराहने कर्णधारपद भूषवलं होतं. तेव्हा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी दारूण पराभव केला होता. त्यामुळे पाचव्या कसोटीत त्याच्या नेतृत्वात अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना बुमराहच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही प्रभावित झाले आहेत.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बुमराहच्या गोलंदाजीने प्रभावित झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, ‘आम्ही इथे एक कायदा पास करू शकतो. या कायद्यानुसार जसप्रीतला डाव्या हाताने गोलंदाजी किंवा एक पाउल टाकत गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येकवेळी जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हाचं चित्र रोमांचक असल्याचं दिसून आलं आहे.’ 1 जानेवारीला रोहित शर्मा आणि इतर सर्व खेळाडू पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी ऑस्ट्रेलियन संघ आणि दिग्गज माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅक्ग्राथही होता. यावेळी अल्बानीज यांनी बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

पाचवा कसोटी सामना टीम इंडियासाठी खूपच महत्वाचा आहे. कसोटी मालिका वाचण्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी शेवटची आस आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल होणार हे निश्चित आहे. रोहित शर्माऐवजी शुबमन गिल संघात येईल. तसेच आकाशदीपला आराम देऊन प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.