तू है तो…! लग्नाच्या वाढदिवशी बुमराहच्या पत्नीने लिहिला रोमँटिक मेसेज, जसप्रीतही झाला भावुक
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली. या दिनाचं औचित्य साधत संजना गणेशने एक रोमँटिक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे पती जसप्रीत बुमराहही भावुक झाला आहे.

जसप्रीत बुमराह मैदानापासून दूर आहे. पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकला होता. तसेच आयपीएल स्पर्धेतही सुरुवातीचे काही सामने खेळणार नसल्याचं समोर आलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज आणि प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहने चार वर्षांपूर्वी संजना गणेशनसोबत लग्नबंधनात अडकला होता. गोव्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 15 मार्च 2025 ला त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिनाचं औचित्य साधत संजना गणेशन हीने पती जसप्रीत बुमराहसाठी एक रोमँटिक पोस्ट केली आहे. संजना गणेशने पोस्ट करत लिहिलं की, ‘तू ही तो है दिल धड़कता है, तू ना तो घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, हॅप्पी-4…’ तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टखाली युजर्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहे.
31 वर्षीय बुमराह सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमधून फिटनेस क्लियरन्सची वाट पाहात आहे. जानेवारीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान त्याला पाठीचा त्रास झाला. तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला मुकला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळू शकला नाही. आता आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यातही खेळू शकणार नाही. बुमराहच्या पाठदुखीवर 2023 शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर जवळपास वर्षभर मैदानापासून लांब होता. त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं. तसेच टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत चांगली कामगिरी केली.
View this post on Instagram
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयचे स्पोर्ट सायंस चीफ नितीन पटेल बुमराहच्या रिकव्हरी लक्ष ठेवून आहे. बुमराहची गोलंदाजी शैली पाहता त्याला दुखापत होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे टीम इंडिया व्यवस्थापन त्याच्या वर्कलोडचं व्यवस्थापन करताना काळजी घेते. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉण्ड यानेही बुमराहला पुन्हा पाठदुखीचा त्रास झाला तर करिअर संपुष्टात येऊ शकतं असा इशारा दिला आहे.