IPL 2022, KKR vs RR, Orange cap : ऑरेंज कॅपवर बटलर’राज’ कायम, जाणून घ्या तुमचा आवडता खेळाडू कुठल्या स्थानी

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय. पाहुया

IPL 2022, KKR vs RR, Orange cap : ऑरेंज कॅपवर बटलर'राज' कायम, जाणून घ्या तुमचा आवडता खेळाडू कुठल्या स्थानी
ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये जॉस बटलर अव्वलImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:22 AM

मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल राजस्थान विरुद्ध कोलकाता नाइट राडर्स सामना झाला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर (KKR vs RR) 7 विकेट राखून विजय मिळवला. नितीश राणा (48) (Nitish Rana) आणि रिंकू सिंह (42) (Rinku Singh) केकेआरच्या विजयाचे हिरो ठरले. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कालच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला विजय आवश्यक होता. नितीश आणि रिंकूने अर्धशतकीय भागीदारी केली. त्या बळावर विजय मिळवता आला. नितीशने षटकार ठोकून कोलकाताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरचा मागच्या सलग 5 सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना कालच्या सामन्यात  विजय आवश्यक होता. कोलकाता नाइट रायडर्सचा हा चौथा विजय तर राजस्थान रॉयल्सचा चौथा पराभव आहे. दरम्यान, यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीत बदल झालाय का? पाहुया

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या ऑरेंज कॅट टेबल पाहिल्यास अद्यापही ऑरेंज कॅपवर बटलर राज कायम आहे. जॉस बटलर पहिल्या क्रमांकावर असून त्याने 588 धावा काढल्या आहे. केएल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर असून 451 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे. त्याने 324धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. चौथ्या स्थानी श्रेयस अय्यर आहे. श्रेयसने 324 धावा आतापर्यंत काढल्या आहेत. तर पाचव्या स्थानी हार्दिक पांड्या आहे. हार्दिकने 308 धावा काढल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

कालच्या सामन्यात काय झालं?

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 152 धावा केल्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधला 47 वा सामना झालाकेकेआरने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी राजस्थान सारख्या बलाढ्य संघाला 153 धावांवर रोखलं. शिमरॉन हेटमायरने अखेरीस केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. राजस्थान रॉयल्सचा डाव अडचणीत असताना संजू सॅमसनने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. संजूने संघाच्या गरजेनुसार खेळ केला. त्याने 49 चेंडूत 54 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होते. संजू खरंतर खूप वेगवान खेळतो. पण कोलकाताच्या गोलंदाजांनीही चांगला मारा करत थोडं जखडून ठेवलं होतं. शिवम मावीच्या गोलंदाजीवर सिंहने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.