IPL 2022, PBKS vs LSG, Orange cap : ऑरेंज कॅपवर बटलर’राज’ कायम, तुमचा आवडता खेळाडू कोणत्या स्थानी? जाणून घ्या

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. ऑरेंज कॅपमधील टॉप पाच खेळाडू बघितल्यास पहिल्या स्थानी जॉस बटलर कायम आहे.

IPL 2022, PBKS vs LSG, Orange cap : ऑरेंज कॅपवर बटलर'राज' कायम, तुमचा आवडता खेळाडू कोणत्या स्थानी? जाणून घ्या
ऑरेंज कॅपमधील टॉप पाच खेळाडू बघितल्यास पहिल्या स्थानी जॉस बटलर कायम आहे.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 9:43 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब (PBKS) विरुद्द लखनौ सुपर जायंट्सने (LSG) वीस धावांनी विजय मिळवलाय. लखनौच्या संघाने गोलंदाजांच्या दमावर विजय मिळवल्यामुळे लखनौ आता पॉईंट्स टेबलमध्ये आगेकूच केलीय. लखनौच्या 154 धाावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला वीस ओवरमध्ये 133 धावाच बनवता आल्या. पंजाबच्या जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक 28 चेंडूत 32 धावा काढल्या. यात त्याने 5 चौकार मारले. तर मयंक अग्रवालने 17 चेंडूत 25 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर ऋषी धवनने 22 चेंडूत 21 धावा काढल्या. त्यात तीन चौकार आणि एक षटकार मारला. मात्र, अखेर पंजाबला टार्गेट पूर्ण करता आलं नाही आणि 20 धावांनी लखनौचा सुपर विजय झाला. यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय ते पाहुया.

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

ऑरेंज कॅपमधील टॉप पाच खेळाडू बघितल्यास पहिल्या स्थानी जॉस बटलर कायम आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 499 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. त्याने 374 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी 307 धावा काढणारा शिखर धवन आहे. चौथ्या स्थानी हार्दिक पांड्या आहे. त्याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 305 धावा काढल्या आहेत. तर पाचव्या स्थानी श्रेयस अय्यर असून त्याने 290 धावा काढल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

डी कॉकचं अर्धशतक हुकलं

पहिला झटका केएल काहुलचा बसला. त्यानंतर डी कॉक चांगला खेळला मात्र थोड्यावरुन त्याचं अर्धशतक हुकलं. संदीप शर्माने जितेश शर्माच्या हाती डी कॉकला झेलबाद केलं. डी कॉकने बाद होण्याआधी 37 चेंडूत 46 धावा काढल्या.

डी कॉकची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जाबचा पराभव

लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 154 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 8 गडी गमावून 153 धावा केल्या होत्या. लखनौ संघाने शेवटच्या 55 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या. लखनौकडून क्विंटन डी कॉकने 47 धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि राहुल चहर यांनी मिळून 6 विकेट घेतल्या. रबाडाने 4 आणि चहरने दोन गडी बाद केले होते.

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.