IPL चा सर्वात महागडा खेळाडू जीवघेण्या आजाराने ग्रस्त, फ्रँचायझीला बसला मोठा झटका

आयपीएलमध्ये महागडा ठरलेला खेळाडू जीवघेण्या गंभीर आजाराने ग्रासलेला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयपीएल लिलाव तोंडावर आला असताना खेळाडूने याबाबत स्वत:खुलासा केला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

IPL चा सर्वात महागडा खेळाडू जीवघेण्या आजाराने ग्रस्त, फ्रँचायझीला बसला मोठा झटका
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 1:56 PM

मुंबई : आयपीएलच्या लिलावाला अवघे काही दिवस बाकी असताना एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएल लिलवात सर्वात महागडा ठरलेला खेळाडू एका जीवघेण्या आजाराने त्रस्त आहे. डॉक्टारांनी तो फक्त 12 वर्षे जगेल असं सांगितलं होतं. आता या आजाराच्या दुसऱ्या स्टेजमध्ये हा स्टार खेळाडू असल्याने त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाही. या आजारपणाबाबत स्वत: खेळाडूने खुलासा केल्याने क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होत आहेत.

कोण आहे तो खेळाडू?

ऑस्ट्रेलिया संघाचा हा स्टार खेळाडू असून त्याला आता सुरू असलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं नाही. इंग्लंडमध्येही या खेळाडूच्या जागेवर मिचेल मार्श याची संघात निवड करण्यात आली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युवा स्टार ऑल राऊंडर कॅमेरून ग्रीन आहे. या आजारासंदर्भात ‘7 क्रिकेट’ला दिलेल्या मुलाखतीत कॅमेरून ग्रीने स्वत: खुलासा केला आहे.

नेमका काय आहे आजार?

‘क्रोनिक किडनी डिसीज’ असं या आजाराचं नाव असून 19 आठवड्यांच्या गरोदरपणात ग्रीनची आई बी ट्रेसीने स्कॅन केले तेव्हा ग्रीनच्या आजाराची माहिती मिळाली होती. युरेथ्रल व्हॉल्व्हमध्ये अडथळे आल्याने लघवीचा प्रवाह किडनीमध्ये परत येतो. ग्रीनची किडनी इतर किडन्यांसारखी शरारीतील रक्त फिल्टर करण्याचं काम करत नाही. फक्त 60 टक्के रक्त फिल्टर होतं जी आजाराची दुसरी स्टेज आहे. क्रोनिक किडनी डिसीजचे पाच टप्पे आहेत. स्टेज 1 हा सर्वात कमी गंभीर आहे आणि स्टेज 5 मध्ये ट्रान्सप्लांट किंवा डायलिसिस आवश्यक असतं.

ग्रीन काय म्हणाला?

मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो. कारण मला मला किडनीच्या आजाराचा जास्त त्रास झाला नाही. जितका इतरांना त्याच गोष्टीचा त्रास होतो. मला गेल्या वर्षी केर्न्समध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळताना त्रास झाला होता. एक इनिंग फिल्डिंग, पाच ओव्हर बॉलिंग आणि नाबाद 89 धावांवर असताना मला त्रास जाणवल्याचं ग्रानने सांगितलं.

दरम्यान, मागील आयपीएलच्या सीझनमध्ये ग्रीनला 17. 50 कोटी रूपयांना लिलावामध्ये खरेदी केलं होतं. मात्र यंदाच्या मोसमात मुंबईने ग्रीनला सोडलं असून आरसीबी संघाने त्याला ट्रेड केलं आहे. ग्रीनने आयपीएल 2023 मध्ये 16 सामने खेळले, 50.22 च्या सरासरीने आणि 160.28 च्या स्ट्राइक रेटने 452 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.