टीम इंडियाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले, पण रोहित शर्माला एक कमकुवत बाजू निस्तरण्यास अपयश
टीम इंडियाने साखळी फेरीत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. 18 गुणांसह टीम इंडिया टॉपला आहे. आता उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. पण साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यात एक चूक दुरूस्त करण्यात रोहित शर्माला अपयश आलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी पाहून आता जेतेपदाच्या आशा वाढल्या आहेत. जेतेपदापासून टीम इंडिया फक्त दोन पावलं दूर आहे. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. उपांत्य फेरीचा हा सामना 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाने सात सामने जिंकताच उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं होतं. शेवटचे दोन सामने दक्षिण अफ्रिका आणि नेदरलँड विरुद्ध होते. हे दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले पण या दोन्ही सामन्यात रोहित शर्माने एक चूक केली. ही चूक न्यूझीलंडच्या लक्षात आली तर ते 15 नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या सामन्यात याचा फायदा घेऊ शकतात. चला जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांनी चांगली फलंदाजी केली. तसेच मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. जडेजाने सुद्धा जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं. पण सूर्यकुमार एकमेव फलंदाज असा होता की त्याला त्याला जास्त गेम टाइम मिळाला नाही. म्हणजेच त्याला जास्त चेंडूंचा सामना करण्याची संधी मिळाली नाही. सूर्यकुमार यादव वर्ल्डकपमध्ये 5 सामने खेळला पण त्याने फक्त 75 चेंडूंचा सामना केला.
उपांत्य फेरीत पात्र झाल्यानंतर शेवटच्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादवला पारखण्याची संधी होती. पण ही संधी रोहित शर्माने गमवल्याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. त्याला फलंदाजीला वर पाठवता येऊ शकलं असतं. जर त्याने मोठी धावसंख्या केली असती तर त्याचा आत्मविश्वास वाढला असता. असं असूनही सूर्यकुमार यादवमध्ये सामना जिंकवण्याची क्षमता आहे. पण त्याला वर खेळण्याची संधी मिळाली असती तर आत्मविश्वास आणखी दुणावला असता.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सूर्यकुमार यादवनी हवी तशी खेळी केली नाही. 5 सामन्यात 21.75 च्या सरासरीने 87 धावा केल्या. इंग्लंड विरुद्ध 49 धावा केल्या होत्या. आता आशा आहे की, सूर्यकुमार यादव न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी चांगल्या करेल.