Rohit Sharma | रोहित शर्मा याची खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियाला मिर्ची लागेल

ऑस्ट्रेलियाने नागपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध खेळण्याआधीच खेळपट्टीचा वाद उकरला. या खेळपट्टीवरुन टीम इंडियावर अनेक आरोप करण्यात आले.मात्र कॅप्टन रोहित शर्मा जे बोलला ते ऐकूण कांगारुना मिर्ची लागेल.

Rohit Sharma | रोहित शर्मा याची खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया, ऑस्ट्रेलियाला मिर्ची लागेल
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 7:33 PM

नागपूर : टीम इंडियाने नागपूरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 132 धावा आणि एक डावाने तिसऱ्या दिवशी विजय मिळवला. या सामन्याचं आयोजन हे नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधला. रोहितने या पत्रकार परिषदेत खेळपट्टीच्या वादावरुन प्रतिक्रिया दिली. रोहितची प्रतिक्रिया ऐकून कांगारुंना नक्कीच झोंबेल. नागपूर कसोटीआधी आपल्या सोयीने टीम इंडियाने खेळपट्टी तयार केल्याचा आरोप हा ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांकडून करण्यात आला होता.

व्हीसीएच्या खेळपट्टीत काहीच वाईट नसल्याचं मत रोहितचं आहे. फिरकीसाठी उपखंडीय खेळपट्टी फायदेशीर आहेत.मात्र त्यासाठी प्लाननुसार खेळणं गरजेचं असतं.ज्या खेळपट्ट्यांवर कांगारुंच्या फलंदाजांना टिकता आलं नाही, त्याच पीचपर रोहितने शतक ठोकलं. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 177 धावांवर ऑलआऊट झाली.

रोहित काय म्हणाला?

“अशा प्रकारच्या खेळपट्टीवर धावा करण्यासाठी अशी पद्धत वापरायला हवी जी पारंपरिक नसेल. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारच्या पीचवर खेळलोय, तिथे धावा करण्यासाठी नव्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो तसेच प्लानिंगही असावी लागते”, असं रोहितने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

रोहित मुंबईच्या खेळपट्टीबाबत काय म्हणाला?

“मी मुंबईत खेळता खेळता मोठा झालोय, मुंबईची खेळपट्टी फार टर्न होते. तुम्हाला थोडं साचेबद्धपणे खेळायला नको. खेळताना पायाचा वापर करायला हवा. काहीतरी वेगळं करुन गोलंदाजांवर दबाव टाकण्याची गरज असते. या सर्व वेगळ्यापणात तुम्हाला शक्य ते करा, जसं की स्वीप शॉट, रिव्हर्स स्वीप मारा”, असंही रोहित म्हणाला.

दरम्यान टीम इंडियाने विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कॅप्टन रोहितसह फिरकी गोलंदाज या विजयाचे शिल्पकार ठरले. आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तिकडीने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

पहिल्या डावात अक्षर पटेल याने 84 आणि रवींद्र जडेजाने 70 धावा केल्या. आर अश्विनने 23 धावा जोडल्या. जडेजाने बॉलिंग करताना पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने दुसऱ्या डावात 5 आणि पहिल्या डावात 3 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.

दरम्यान मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमम्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.