दुसऱ्या कसोटी सामन्यात जर गणित चुकलं असतं तर…! रोहित शर्माने सांगितला काय होता ‘रिस्क फॅक्टर’

बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने 2-0 ने जिंकली. या मालिकेपूर्वी बांगलादेशने आव्हान निर्माण केलं होतं. पण त्या आव्हानाची संपूर्ण हवा या दोन मालिकेतून निघाली. दुसरा कसोटी सामना तर ड्रॉच्या वेशीवर होता. पण भारताने जबरदस्त खेळी केली. पण भारताचं एक गणित चुकलं असतं तर काय झालं असतं? याबाबत खुद्द रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं.

दुसऱ्या कसोटी सामन्यात जर गणित चुकलं असतं तर...! रोहित शर्माने सांगितला काय होता 'रिस्क फॅक्टर'
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 3:13 PM

भारताने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात चमत्कार केला असं म्हंटलं तर वावगं ठरणार आहे. खरं तर हा सामना पूर्णपणे ड्रॉच्या दिशेने झुकला होता. पण भारतीय संघाने विजय खेचून आणला. पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा खेळ झला. त्यानंतर दोन दिवस वाया गेला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. पण चौथ्या दिवशी सामना सुरु झाला आणि भारताने कमबॅक केलं. बांगलादेशला 233 धावांवर रोखलं. या धावांचा पाठलाग करताना 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेतली. तसेच दुसऱ्या डावात बांगलादेशला 146 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 94 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान भारताने 3 गडी गमवून पूर्ण केलं. दीड दिवसातच या सामन्याचा निकाल लावला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा याने मन मोकळं केलं आहे. तसेच सामन्यातील जोखि‍मेबाबतही सांगितलं.

कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं की, आम्ही सर्वजण पुढे जात आहोत. साहजिकच काही टप्प्यावर आम्हाला वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसोबत काम करायला सुरुवात करावी लागली. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्यासोबत आम्ही चांगला वेळ घालवला. आता गौतम गंभीर यांच्यासोबत पुढे जाण्याची वेळ आहे. मी त्याच्यासोबत खेळलो आहे. तो काय विचार करतो हे मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याच्यासोबत एक चांगली सुरुवात झाली आहे. एक तर या सामन्याचे अडीच दिवस वाया गेला होता. पण जेव्हा आम्ही चौथ्या दिवशी खेळण्यासाठी आलो तेव्हा आम्हाला त्यांना झटपट बाद करायचं होतं. तसेच फलंदाजीत काय करू शकतो त्याचा अंदाज घ्यायचा होता. ते 233 धावांवर ऑलआऊट झाले तेव्हा ते आम्हाला मिळालेल्या धावांबद्दल नव्हते तर आम्ही त्यांच्याकडून किती षटके मिळवली याचं गणित होतं.’

‘खेळपट्टीत फारसे काही नव्हते. त्या खेळपट्टीवर खेळ करून दाखवणे हा एक उत्कृष्ट प्रयत्न होता. ही एक जोखीम आम्ही घेण्यास तयार होतो कारण जेव्हा तुम्ही अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला कमी धावसंख्येसाठी बाद होऊ शकता. पण आम्ही 100-150 धावांवर बाद झालो तरी त्यासाठी तयार होतो.’, असं कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.