IND vs AUS Final : मोठ्या मनाचा हिटमॅन, पराभवानंतर रोहित शर्मा सरळ सरळ म्हणाला..
IND vs AUS Final : टीम इंडियाला पराभूत करत परत एकदा ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. फायनलमध्ये झालेला पराभव रोहित शर्माच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा पाहा काय म्हणाला?
अहमदाबाद : वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकत टीम इंडियाला बॅटींगसाठी आमंत्रण दिलेलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 240 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 43 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केलं. ट्रॅव्हिस हेडने केलली 137 धावांची शतकी खेळी आणि लाबुशेन याच्या 58 धावांची अर्धशतकी खेळीने टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.
रोहित शर्मा काय म्हणाला?
सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही, आज आम्ही सर्वोतपरी प्रयत्न केले होते मात्र ते अपुरे पडले. या टार्गेटमध्ये आणखी 20 ते 30 धावा होऊ शकल्या असत्या. विराट कोहली आणि के. एल. राहुल यांनी दमदार भागीदारी केलेली, आमचं 270-80 धावा करण्याचं टार्गेट होतं पण विकेट जात राहिल्या. 240 धावांचा तुम्ही बचाव करत असताना सुरूवीतालाच विकेट मिळवायला हव्या होत्या. पण हेड आणि लाबूशेन यांनी आम्हाला बॅकफूटला ढकललं. मी कोणतंही कारण देऊ शकत नाही कारण आम्ही पुरेशा धावा केल्या नसल्याचं रोहित शर्मा याने म्हटलं आहे.
रोहित शर्माने पराभवाचं कोणतंही कारण न देता पराभव मान्य केला, आजच्या सामन्यातही रोहितने सुरूवातीला कागारूंवर आक्रमण केलं होतं. मात्र शुबमन गिल 4 धावा आणि श्रेयस अय्यर 4 धावा यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्यासोबतच रविंद्र जडेजा आणि सुर्यकुमार यादव यांना मोठी खेळी करण्यात सपशेल फेल गेले.
सामना संपल्यानंतर मैदानावरून माघारी परतताना रोहितच्या डोळ्यात पाणी आलेलं सर्वांनी पाहिलं. रोहितने कर्णधार म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावलेलं, रेकॉर्डचा उंबरठा पाहिलं नाही धावांची भूक गड्याने शेवटच्या सामन्यापर्यंत सेल्फलेस बॅटींग केली.
पॅट कमिन्स (C), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क
रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.