Icc चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या तिघांची नावं फिक्स! कोण आहेत ते?
Team India Icc Champions Trophy 2025 : आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. एकूण 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मात्र इंग्लंडव्यतिरिक्त इतर संघांनी अद्याप टीम जाहीर केलेली नाही.
बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांना आता अनेक वर्षांनंतर होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत.चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 22 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना टीम जाहीर करण्यासाठी 12 जानेवारी अंतिम मुदत आहे. बीसीसीआय निवड समिती या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कुणाला संधी देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या तिघांची नावं निश्चित आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
टीम इंडियाचं त्रिकुट
टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज-माजी कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांचं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचं संघातील स्थान निश्चित आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफीत कॅप्टन्सी करण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे. तसेच जसप्रीत बुमराह याला उपकर्णधारपद मिळू शकतं, असंही म्हटलं जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत थोडक्यात
दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. तर अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस असणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये 15 सामने खेळवण्यात येणार आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. पाकिस्तानकडे यजमानपदाचा मान असल्याने टीम इंडियाचे सामने हे सुरक्षिततेच्या कारणामुळे यूएईत होणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियाचे सामने हे दुबईत होतील. तर पाकिस्तानमध्ये होणारे सामने रावळपिंडी, लाहोर आणि कराचीत खेळवण्यात येतील.
दरम्यान इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळाडूंची नावं जाहीर करणारी पहिली टीम ठरली आहे. जोस बटलर चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावं लागलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार),,जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड