IND vs SA : जे रोहितने हेरलं ते कोणत्याच टीमला नाही जमलं, ‘या’ मास्टरप्लॅनमुळेच आफ्रिकेचं काम तमाम
IND vs SA : दोन बाहुबली मानले जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात भारताच्या शिलेदारांनी 243 धावांनी दमदार विजय मिळवला. प्रत्येक सामन्यामध्ये तीनशे फिक्स करणारी आफ्रिका भारतासमोर ढेर व्हायला रोहितच्या एका मास्टरप्लॅननेही काम करून टाकलं.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये पॉईंट टेबलला टॉप दोनला असलेले संघ भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये हा सामना झाला. भारताच्या 327 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजांनी आफ्रिकेच्या संघाचा 83 धावांवर खुर्दा पाडला. जो आफ्रिका संघ सहज तीनशेच्या पुढे धावा करायचा तो 100 धावाही कसा करू शकला नाही. भारताविरूद्धच्या सामन्यात असं काय झालं की बाहुबली असणारा संघ इतक्या वाईट पद्धतीने हरला. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का आफ्रिका संघ यंदाच्या वर्ल्ड कप फक्त एका संघाकडून पराभूत झाला होता. तो संघ नेदरलँड होता, भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक गोष्ट हेरली त्या दृष्टीने मास्टरप्लॅन केला.
काय होता रोहितचा मास्टरप्लॅन?
आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेन या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाविरूद्ध पहिल्यांदा बॅटींग केलेली. पहिल्यांदा फलंदाजी करताना तीनशे-चारशे धावांचा डोंगर ते सहज उभारायचे. त्यानंतर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विरोधी संघाचे फलंदाज मोठे फटके खेळून आऊट व्हायचे आणि त्यानंतर टार्गेटच्या दबावामध्ये ठराविक अंतराने विकेट गेल्या की आफ्रिकन गोलंदाज सामन्यावर पकडायचे. हे जसं त्यांच्या विजयाचं सूत्रच ठरल्यासारखं होतं.
आफ्रिकेच्या संघाने न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघाना पराभूत केलं होतं. फक्त उलटफेर झालेला तो नेदरलँड संघाने आफ्रिकेला हरवत सर्वांना आचंबित करून टाकलं होतं. मात्र त्या सामन्यामध्ये नेदरलँड संघाने पहिल्यांदा बॅटींग करत 245 धावा केल्या होत्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 207 वर ऑल आऊट झालेला. यावरून एक लक्षात आलं की आफ्रिका संघ दुसऱ्यांदा बॅटींगला उतरल्यावर त्यांचं गणित चुकत आहे. स्पिनर्ससमोर ते जास्त काही खास करू शकत नसल्याचं दिसून आलं. दुसरं उदाहरण म्हणजे पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातही पाकच्या 271 धावांचा पाठलाग करताना जवळपास सामना गमावलाच होता. मात्र त्यावेळी केशव महाराज आणि शम्सी यांनी टिकून खेळत 1 विकेटने विजय मिळवला.
रोहितनेही आफ्रिकेविरूद्ध हाच मास्टरप्लॅन ठेवला. इतरवेळी टॉस जिंकला तर पहिल्यांदा फिल्डिंग घेणाऱ्या हिटमॅनने बॅटींग घेतली. नेहमीप्रमाणे त्याने सुरुवातीपासूनच आपला दांडपट्टा सुरू ठेवला आणि एक मजबूत सुरूवात करून देत आफ्रिकेच्या बॉलर्सचं खच्चीकरण करण्याचं काम त्याने केलं. राहिलेलं बाकी काम प्रत्येक खेळाडूने चोख पार पडलं आणि त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी तर आफ्रिकेला चारीमुंड्या चीत केलं.