IPL 2024 मधून राजस्थान आऊट, संजू पहिल्यांदाच उघडपणे बोलला, पराभवाचं खापर कुणावर फोडलं?
IPL 2024 SRH vs RR : राजस्थान रॉयल्सचं आयपीएलच्या 17 व्या मोसमातून पॅकअप झालं आणि अंतिम सामन्यात पोहचणारी दुसरी टीम निश्चित झाली. सनरायजर्स हैदराबादने राजस्थानवर विजय मिळवत फायनलचं तिकीट मिळवलं. राजस्थानच्या पराभवासाठी कॅप्टन संजू सॅमसन याने कुणाला जबाबदार ठरवलं?
संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स टीमचं आयपीएलच्या 17 व्या मोसमातून पॅकअप झालंय. क्वालिफायर 2 सामन्यात सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर 36 धावांनी विजय मिळवला. राजस्थानचं अशाप्रकारे यंदाही आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. राजस्थान याआधी 2022 साली गुजरात टायटन्सकडून अंतिम सामन्यात पराभूत झाली होती. राजस्थानच्या पराभवानंतर कॅप्टन संजू सॅमसन फार निराश झालेला दिसून आला. संजूच्या आवाजातील उत्साह आणि चेहऱ्यावरचं तेज हरवलेलं. रात्री दव पडेल अशी आशा होती, मात्र तसं झालं नाही, त्यामुळे सर्व गणित फिस्टरल्याचं संजू सॅमसन सामन्यानंतर म्हणाला.
राजस्थानला आरसीबी विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात दव असल्याचा फायदा झाला होता. तो सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. त्या सामन्यात दव पडल्याने रात्री आरसीबीच्या गोलंदाजांना अडचणी येत होत्या. मात्र आता क्वालिफायर 2 सामन्यात तसं झालं नाही. त्यामुळे हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने स्पिनर्सचा चलाखीने वापर केला.
संजू सॅमसनने कुणाला ठरवलं आरोपी?
“दव कधी पडणार? याचा अंदाज बांधणं अवघड होतं. दुसऱ्या डावात खेळपट्टी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होती. बॉल टर्न होत होता. आमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांसमोर हैदराबादने स्पिनर्सचा शानदार उपयोग केला”, असं संजू सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हटलं.
“आमच्या टीमने बॉलिंग चांगली केली. मात्र मधल्या ओव्हर्समध्ये फलंदाजांनी चांगली बॅटिंग न केल्याचा फटका आम्हाला बसला. मिडल ऑर्डरमध्ये आम्ही मागे पडलो. बॉल टर्न होत असताना आम्ही स्वीप शॉट आणि पायांद्वारे मोठे फटके मारु शकलो असतो. मात्र त्यांनी चांगली बॉलिंग केली”, असं संजूने मान्य केलं.
संजू सॅमसनच्या प्रतिक्रियेतील दवबाबतचा मुद्दा
No dew tonight at the Chepauk Stadium. pic.twitter.com/sESpA1IhJc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 24, 2024
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट आणि टी नटराजन.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कैडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमैन पॉवेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, संदीप शर्मा आणि युजवेंद्र चहल.