Catch | वजनावर जाऊ नका, ना हातानाे ना पायाने गड्याने पाठीने घेतलाय कॅच.. व्हिडीओ मजबूत व्हायरल

Tenis Ball Keeper Catch Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण असा फिल्डिंगचा नमुना क्विचितच पाहायला मिळतो. गड्याचं वजन सहज ८५ ते ९० असल पण कॅच एखाद्या चपळ चित्यासारखा घेतला.

Catch | वजनावर जाऊ नका, ना हातानाे ना पायाने गड्याने पाठीने घेतलाय कॅच.. व्हिडीओ मजबूत व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 5:19 PM

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावरील अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. तुफानी बॅटींग किंवा आक्रमक बॉलिंग स्पेल आपण पाहतो. काहीवेळा कोणालाच विश्वास बसणार नाही अशी फिल्डिंग खेळाडू करतात. तर काही रन आऊटही असे खतरनाक असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठिण जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंवा देशांतर्गत सामन्यांमध्ये नाहीतर काहीवेळा लोकल क्रिकेट टूर्नामेंटमध्ये काहीतरी वेगळं होताना दिसतं. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विकेटकीपरने कॅच पकडला पण त्याला हात लावला ना पाय लावला मग नेमका झेल घेतला तरी कसा? जाणून घ्या.

नेमका कसा झेल घेतला?

बॉलरने टाकलेला बॉल टोलावताना कट घेऊन कीपरच्या उजव्या बाजूला गेला. त्यावेळी कीपरने बाजूला डाय मारत कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. बॉल हाताला लागला थोडा वर उडाला होता, डाय मारल्यामुळे कीपर पडलेला असताना बॉल त्याच्याच अंगावर पडला. मग काय गड्याने एकदम संतुलन ठेवत बॉल पाठीवरून खाली पडू दिला नाही. हाताची उलटी घडी घालत बॉलला अडवलं. इतर खेळाडूंनी तो बॉल येत घेतला आणि बॅट्समन आऊट झाला.

पाहा व्हिडीओ-

केसीएल वि. केपीएल या दोन संघांमध्ये हा सामना पार सुरू होता. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हे सर्व घडलं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीपर थोडा धष्टपुष्ट असल्याने त्याच्याकडून हा कॅच पूर्ण होईल अशी अपेक्षाच केली नव्हती. मात्र म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर असंच काहीस घडलं. जर कीपरने प्रयत्नच केला नसता तर तो फोर गेला असता. मात्र त्याच्या प्रयत्नाने विकेट मिळाली.

दरम्यान, क्रिकेटमध्ये अनेक उत्कृष्ट कॅच आपण पाहिले मात्र या कॅचची बातच वेगळी होती. फक्त मजा म्हणून नाही पण आयुष्यातही या कॅचमधून एक धडा शिकल्यासारखं आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.