Video : खेळला पहिलीच मॅच, पहिल्या मॅचमध्ये पकडली खत्रूड कॅच! Video पाहून तुम्हीही म्हणाल, भावा जिंकलस!

हा असा झेल होता की जो फार कठीण होताच पण सामन्यातील परिस्थिती आणि दबाव पाहता अधिकच कठीण झाला होता.

Video : खेळला पहिलीच मॅच, पहिल्या मॅचमध्ये पकडली खत्रूड कॅच! Video पाहून तुम्हीही म्हणाल, भावा जिंकलस!
एव्हिन लुईसImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 9:20 AM

मुंबई : क्रिकेट (Cricket) खेळाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे संघातील सर्व 11 खेळाडूंना फलंदाजी किंवा गोलंदाजीची संधी मिळो अथावा न मिळो, परंतु प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी सामना पालटण्याची संधी आणि क्षमता मिळते. अनेकवेळा असं घडतं जेव्हा एखाद्या खेळाडूला फक्त एक चेंडू मिळतो आणि या छोट्या संधीतही तो खेळाडू अप्रतिम कामगिरी करून जातो. क्रिकेटमध्ये असे अनेक किस्से आपण यापूर्वी देखील ऐकले असतील. लखनौ सुपर जायंट्सपेक्षा (LSG) अधिक कोणाला ही गोष्ट समजेल म्हणा. कालच्या सामन्यात त्यांना असंच काहीसं पहायला मिळालं. कोलकाता नाईट रायडर्सचा एका रोमांचक सामन्यात दोन धावांच्या अल्पशा फरकाने पराभव करून रोमहर्षक पद्धतीने प्लेऑफमध्ये लखनौनं प्रवेश केला. पण या सामन्यात एव्हिन लुईसनं (Evin Lewis) असं काही केलं की काल त्याची जोरदार चर्चा रंगली, कौतुकांचा वर्षाव झाला. सगळीकडे लुईस अशीच चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

विजयासाठी क्विंटन डी कॉकच्या डोक्यावर पट्टी बांधील गेली होती. पण तोच फरक प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संधी मिळालेल्या खेळाडूने केला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामनन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत 210 धावा केल्या. एवढी मोठी धावसंख्या करण्याचे श्रेय सलामीवीर क्विंटन डी कॉकला जातो.  त्याने 70 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने त्याच्यासोबत मिळून या संपूर्ण धावा केल्या. त्यानंतर कोलकातानेही जोरदार प्रत्युत्तर देत श्रेयस अय्यर-नितीश राणा आणि सॅम बिलिंग्ज यांच्या खेळीने सामना रोमांचक ठेवला. त्याननंतर फासे दिसू लागल्यावर रिंकू सिंगने डाव सांभाळला.

सामना दोन चेंडूत पलटला

कोलकात्याच्या या फलंदाजाने अवघ्या 14 चेंडूत 40 धावा ठोकत संघाला विजयाच्या जवळ नेलं. शेवटच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या 19 धावांपैकी त्याने पहिल्या चौर चेंडूत 16 धावा घेतल्या. आता 2 चेंडूत धावा हव्या होत्या आणि रिंकूने हवेत चेंडू खेळला. यावेळी चेंडू कव्हर्सच्या दिशेनं हवेत उंच गेला. एक कठीण झेल होता. ज्यामुळे सामन्याचे भवितव्य ठरवता आले असते. शेवटी तेच घडले. एव्हिल लुईसने ते करुन दाखवलं. लुईस खोल बॅकवर्ड पॉईंटपासून सुमारे 30 मीटर धावला आणि नंतर डाईव्ह मारताना डाव्या हाताने झेल घेतला. यावेळी मैदानातील क्रिकेटप्रेमींच्या तोंडात बोट गेलं.

लुईसची अप्रतिम कॅच पाहा

ज्याने लुईसचा हा झेल ज्यांनी पाहिला त्यांच्याही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. हा असा झेल होता की जो फार कठीण होताच पण सामन्यातील परिस्थिती आणि दबाव पाहता अधिकच कठीण झाला होता. झेल लुईच्या हातात उडकला जणू तो त्याच्यासाठीच बनवला होता.

खत्रूड कॅच, Video पाहण्यासाठी इथे क्लिक करा

9 सामन्यानंतर संधी

या एका झेलने सामन्याची दिशा बदलून टाकली होती. शेवटच्या चेंडूवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर लखनौ सामना जिंकला. साहजिकच हा झेल चर्चेचे कारण बनला आणि आयपीएलमधील सर्वेत्कृष्ट झेल म्हणण्यात काही गैर नाही, अशीही चर्चा काल रंगली. विशेष बाब म्हणजे लुईस नऊ सामन्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघात परतला आहे. त्याने पहिले चार सामने खेळले. ज्यात त्याने एक अर्धशतकाच्या मदतीने 71 धावा केल्या. यावेळी त्याला संघात संधी मिळाली. त्यामुळे या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजाची फलंदाजी आली नाही. कारण राहुल आणि डी कॉक यांनी संपूर्ण 20 षटके फलंदाजी केली. तो गोलंदाजी करत नाही. अशा परिस्थितीत 39.4 षटके फारसे योगदान न देता, लुईस आयपीएलच्या सर्वात चांगल्या क्षणाचा मुख्य पात्र बनला आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.