CCL League 2024 | पंजाब दे शेर दहाव्या पर्वासाठी सज्ज, News9 Plus वर खास सीरिज

Celebrity Cricket League 2024 | क्रिकेट चाहत्यांना सीसीएलमधील आघाडीची टीम पंजाब दे शेर यांच्यावर आधारित खास शो, डॉक्युमेंट्री आणि खूप काही News9 Plus या पहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहता येणार आहेत.

CCL League 2024 | पंजाब दे शेर दहाव्या पर्वासाठी सज्ज, News9 Plus वर खास सीरिज
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 7:24 PM

मुंबई | आयपीएलच्या 17 व्या मोसमाचे वेध क्रिकेट चाहत्यांना लागून राहिले आहेत. त्याआधी वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धा पार पडणार आहे. आयपीएलला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर देशविदेशात टी 20 लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. अशात आता सेलिब्रिटी क्रिकेट लीग स्पर्धेलाही काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सीसीएलच्या दहाव्या पर्वाचं आयोजन हे शारजाह आणि भारतातीत विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. भारतातील एकूण 5 शहरांमध्ये सामने पार पडतील. या दहाव्या पर्वात 23 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत साखळी फेरीत 10 सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफमधील 4 सामन्याचं आयोजन हे वायझॅग येथे करण्यात आलं आहे.

सीसीएल क्रिकेट लीगमध्ये एकूण 8 फिल्म इंडस्ट्रीतील 8 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मुंबई हिरोज, केरळा स्ट्रायकर्स, तेलुगु वॉरियर्स, भोजपूरी दबंग्स, कर्नाटका बुलडोझर, बंगाल टागयगर्स, चेन्नई राइनोज आणि पंजाब दे शेरे या अशा 8 संघांमध्ये चॅम्पियन होण्यासाठी चुरस पाहायला मिळेल. सलामीची लढत ही मुंबई हिरोज विरुद्ध केरळ स्टायर्कस यांच्यात होईल. साखळी फेरीतील पहिले 5 सामने हे शारजाहमध्ये पार पडतील.

त्यानंतर उर्वरित सामने भारतात पार पडतील. भारतात हैदराबाद, बंगळुरू, चंदीगढ, त्रिवेंद्रम आणि वायझॅग या 5 शहरांमध्ये सामने पार पडतील. स्पर्धेतील सामन्यांना दुपारी अडीच वाजता आणि संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होईल.

सोनू सूद पंजाब दे शेरचा कॅप्टन

दरम्यान या स्पर्धेत पंजाब दे शेर या टीमच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सोनू सूद हा पंजाब दे शेरे या टीमचं नेतृत्व करणार आहे. पंजाब दे शेर हंगामातील पहिला सामना हा 25 फेब्रुवारी रोजी चेन्नई राइनोज विरुद्ध खेळणार आहे.

पंजाब दे शेर सलामीच्या सामन्याआधी सरावाच्या हेतूने प्रदर्शनी आणि सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 16 डिसेंबर रोजी पार पडला. या सामन्यात पंजाब दे शेर टीमने पंजाब एज्युकेटर्सवर विजय मिळवला. त्यानंतर पंजाब दे शेर टीमचा दुसरा सामना हा 27 जानेवारी रोजी आयआरएस ऑफीसर्स ईलेव्हन यांच्यात सामना झाला. तर फेब्रुवारी महिन्यात पंजाब दे शेर टीमसाठी आणखी 3 सराव सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. टीव्ही9 नेटवर्क आणि न्यूज9 हे पंजाब दे शेरसाठी मीडिया पार्टनर असणार आहेत.

आयआरएस ऑफीसर्स ईलेव्हन विरुद्धच्या सामन्यासाठी पंजाब दे शेर टीम | गुरुप्रीत घुग्गी, बिन्नू ढिल्लो, निन्जा, जस्सी गिल, बबल राय, मनमीत सिंग (मित बंधू) देव खारोद, गॅवी चॅनेल, सुयश राय, दक्ष अजित सिंह, मयूर मेहता, अनुज खुराणा आणि राहुल जेटली.

सीसीएल 2024 चं वेळापत्रक

TV9 नेटवर्क आणि क्रिकेट

दरम्यान tv9 नेटवर्क आणि क्रिकेटचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा जवळचा संबंध आहे. tv9 ग्रुप आयपीएल फ्रँचायजी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचे प्रायोजक होते. तसेच TV9 ने ‘Action Replay बग’ साठी Star Sports सोबत प्रायोजकत्व करार केला होता.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.