आयपीएलमध्ये (IPL Auction 2022) चेन्नईच्या टीमकडे सगळ्यांचीच नजर असते. 2022च्या आयपीएल सीझनसाठी चेन्नईचा संघ अखेर तयार झाला आहे. या टीममध्ये चार खेळाडूंना रिटेन (CSK retained 4 player) करण्यात आलं आहे. त्यामध्ये धोनी (MS Dhoni) आणि जाडेजासह मोईल अली आणि ऋतूराज गायकवाडचाही समावेश आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आयपीएलच्या 2022च्या सीझनसाठी लिलाव सुरु होता. संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर या सीझनकडे लागली होती. आतापर्यंतच्या कारकिर्दीत चेन्नईनं जवळपास प्रत्येक सीझनमध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघात कुणाकुणाला घेतलं जातं, याची उत्सुकता सगळ्यांचं असते. म्हणूनच आता या संघात नेमकं कोण आहे, कुणाची किती किंमतीत खरेदी करण्यात आली आहे, त्यावर एक नजर टाकुयात..
ड्वेन ब्रावो (Rs 4.40 crore)
रॉबिन उथप्पा ( Rs 2 crore)
अंबाती रायडू (Rs 6.75 crore)
दीपक चाहर (Rs 14 crore)
केएम आसिफ (Rs 20 lakh)
तुषार देशपांडे (Rs 20 lakh)
शिवम दुबे (Rs 4 crore)
महेश थिकक्षना (Rs 70 lakh)
राजवर्धन हंगार्गेकर (Rs 1.50 crore)
सिमरजीत सिंह (Rs 20 lakh)
देवॉन कॉनवे (Rs 1 crore)
ड्वेन प्रीटोरीअस (Rs 50 lakh)
मिचेर सॅन्टनर (Rs 1.90 crore)
ऍडम मिलन (Rs1.90 crore)
सुब्रांशू सेनापती (Rs 20 lakh)
मुकेश चौधरी (Rs 20 lakh)
प्रशांत सोलंकी (Rs 1.20 crore)
The Think tank making it a Super Sunday for all of us! ??#SuperAuction #WhistlePodu ? pic.twitter.com/Pb0IBrVc7R
— Chennai Super Kings – Mask P?du Whistle P?du! (@ChennaiIPL) February 13, 2022
रविंद्र जाडेजा (Rs 16 crore
महेंद्रसिंह धोनी (Rs 12 crore)
मोईन अली (Rs 8 crore)
ऋतुराज गायकवाड (Rs 6 crore)
48 कोटीच्या पर्समध्ये 42 कोटी खर्चून चार जणांना रिटन करत सीएसकेनं आपला संघ सज्ज केलाय. गेल्याच वर्षी सीएसकेनं आपल्या नावे चौथी आयपीएल ट्रॉफी केली होती. 2021सोबतच 2010, 2011 आणि 2018 मध्येही सीएसकेनं आयपीएलमध्ये बाजी मारली होती.
Tushar Deshpande IPL 2022 Auction: धोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?
खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?
Mumbai Indians IPL Auction 2022: ‘ही’ आहे मुंबईने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंची यादी