IPL 2022, CSK vs MI : इंडियन्सने टॉस जिंकला, अखेर वाढदिवसाच्या दिवशीच पोलार्डला ‘सुट्टी’,जाणून घ्या संघातील बदल
मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीमच्या गोलंदाजीत आता थोडीफार सुधारणा झालीय.
मुंबई: आज आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होतोय. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला असून चेन्नईला पहिले फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तिकडे पोलार्डला वाढदिवसाच्या दिवशीच सुट्टी देण्यात आलीय. नेहमी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या (CSK vs MI) सामन्यावर सर्वाधिक नजर असते. यंदाच्या सीजनमध्ये दोन्ही संघांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पण लीगच्या इतिहासातील दोन्ही यशस्वी संघ आहेत. पॉंइंटस टेबलमध्ये मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ तळाला आहेत. मुंबईच, तर स्पर्धेतील आव्हान कधीच संपुष्टात आलय. चेन्नईचा संघ फक्त अपेक्षेवर आहे. त्यांचा प्लेऑफचा (Playoff) मार्ग खूपच खडतर आहे. आज दोन्ही संघ भिडतील. त्यावेळी मुंबई चेन्नईला नमवून त्यांचही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणते की, CSK चं आव्हान अजून काही दिवस टिकून रहात, यावर सगळ्यांच्या नजरा असतील. चेन्नईचा संघ या पुढच्या सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा शिवाय उतरणार आहे. जाडेजा दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे जाडेजा पुढचे सगळेच सामने खेळणार नसल्याची माहिती आहे.
#MumbaiIndians have won the toss and they will bowl first against #CSK
हे सुद्धा वाचाLive – https://t.co/WKvmUFxvMF #CSKvMI #TATAIPL pic.twitter.com/aer2yME8wZ
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
A look at the Playing XI for #CSKvMI
Live – https://t.co/WKvmUFxvMF #CSKvMI #TATAIPL https://t.co/hOoLGDHDLM pic.twitter.com/xXUNfLLddw
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
ऐनवेळी संघात बदल?
CSK vs MI संभाव्य प्लेइंग – 11
चेन्नई – एमएस धोनी (कॅप्टन), डवेन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सिमरजीत सिंह
Match 59.Chennai Super Kings XI: R Gaikwad, D Conway, R Uthappa, A Rayudu, S Dube, MS Dhoni (c/wk), M Ali, D Bravo, M Choudhary, M Theekshana, S Singh. https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
Namma XI is Unchanged! ?#CSKvMI #Yellove #WhistlePodu ? pic.twitter.com/wBXwvuoPSS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 12, 2022
मुंबई – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, संजय वर्मा, टिम डेविड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, रायली मेरेडिथ, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह
Match 59.Mumbai Indians XI: R Sharma (c), I Kishan (wk), T Stubbs, T Varma, D Sams, T David, R Singh, J Bumrah, H Shokeen, K Kartikeya Singh, R Meredith. https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
कशी वाटत आहे आजची ??????? ??, पलटन? ??
2⃣ changes for us from the last game.
➡️ Stubbs, Shokeen ⬅️ Pollard, Ashwin#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #CSKvMI @Dream11 pic.twitter.com/czlMqyKeb6
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2022
पोलार्डला आराम मिळला
मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीमच्या गोलंदाजीत आता थोडीफार सुधारणा झालीय. जसप्रीत बुमराहने तर मागच्या सामन्यात कहर केला. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने केकेआरची वाट लावून टाकली. पण फलंदाजांनी निराश केलं. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. यंदा पॉइंटस टेबलमध्ये दोन्ही संघांनी खूपच खराब प्रदर्शन केलय. चेन्नईकडे फक्त नाममात्र अपेक्षा आहेत. आतापर्यंत चेन्नई आणि मुंबईचा सामना नेहमीच रोमांचक झाला आहे. मागच्या सामन्यात तर धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून चेन्नईला विजय मिळवून दिला होता. पोलार्ड खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला वाढदिवसाच्या दिवशीच बाहेर बसवलंय.
Stunning stats ? Special cricketer ? https://t.co/eDc54r58jC
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2022
चेन्नईचा संघ या पुढच्या सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा शिवाय उतरणार आहे. जाडेजा दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे जाडेजा पुढचे सगळेच सामने खेळणार नसल्याची माहिती आहे.