CSK vs MI : 6,6,6,4,4,4,4,4,4, कॅप्टन ऋतुराज गायकवाडकडून कडक सुरुवात, मुंबईविरुद्ध वादळी अर्धशतक
Ruturaj Gaikwad Fifty CSK vs MI IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने मुंबई इंडियन्सविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकलं आहे. ऋतुराजने फक्त 22 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं.

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात (IPL 2025) धमाकेदार सुरुवात केली आहे. ऋतुराजने मोहिमेतील पहिल्याच आणि स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात झंझावाती सुरुवात केली आहे. ऋतुराजने मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना वादळी अर्धशतक झळकावलं आहे. ऋतुराजच्या या खेळीसह चेन्नई मजबूत स्थितीत पोहचली आहे. त्यामुळे मुंबईची डोकेदुखीही वाढली आहे. मुंबईने चेन्नईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे.
ऋतुराजचं स्फोटक अर्धशतक
चेन्नईकडून राहुल त्रिपाठी आणि रचीन रवींद्र ही सलामी जोडी मैदानात आली. चेन्नईला या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र दीपक चाहर याने ही जोडी फोडून मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. दीपकने राहुलला 2 धावांवर रियान रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं.राहुल आऊट झाल्यानंतर ऋतुराज मैदानात आला. ऋतुराजने मैदानात येताच दणादण फटकेबाजी करायला सुरुवात केली. ऋतुराजने चौफेर फटकेबाजी करत सिक्स आणि फोरचा पाऊस पाडला.
ऋतुराजने फक्त 22 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजने 227.27 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं. ऋतुराजने या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार झळकावले.
ऋतुराजचं पहिल्याच सामन्यात अर्धशतक
Leading from the front 🙌#CSK captain Ruturaj Gaikwad walks back but not before he brought up his FASTEST #TATAIPL FIFTY off just 22 deliveries 👏
Updates ▶ https://t.co/QlMj4G7kV0#CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/3bB2GL6G5n
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
चेन्नईसमोर 156 रन्सचं टार्गेट
दरम्यान मुंबईने चेन्नईला 156 धावांचं आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. मुंबईसाठी तिलक वर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अखेरीस दीपक चाहर या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तिलकने 31 आणि सूर्याने 29 धावा केल्या. तर अखेरीस दीपर चाहर याने नाबाद 28 धावांची खेळी केली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस आणि खलील अहमद.