IPL 2021 : चेतेश्वर पुजाराचे उत्तुंग षटकार, नेटकरी म्हणतात, धोनीच्या संगतीचा परिणाम?
संथ खेळीसाठी ओळखला जाणारा कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) सध्या आक्रमक अंदाज पाहायला मिळत आहे. | Cheteshwar Pujara
मुंबई : संथ खेळीसाठी ओळखला जाणारा कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) सध्या आक्रमक अंदाज पाहायला मिळत आहे. एम एस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नईत दाखल झाल्यानंतर नेटमध्ये प्रॅक्टिस करताना पुजाराने उत्तुंग षटकार खेचले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एम एस धोनी (MS Dhoni) जसे उत्तुंग षटकार खेचतो तसेच षटकार पुजाराही खेचत असल्याने हा धोनीच्या संगतीचा परिणाम आहे का?, असा प्रश्न सध्या नेटकरी व्हिडीओ पाहून विचारत आहेत. (Chennai Super Kings Cheteshwar pujara net practice Six Video IPL 2021 MS Dhoni)
षटकार मारण्याचा कसून सराव
चेतेश्वर पुजाराची ओळख एक चिवट खेळाडू म्हणून आहे. तो खेळपट्टीवर उभा राहण्यात त्याचा हात कुणाला धरु देणार नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आऊट करताना बोलर्स अगदी त्रासून जातात. अशातच छोट्या फॉरमॅट खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पुनरागमन करताना षटकार आणि चौकारांसह पुनरामन करीत आपल्यातल्या क्लास दाखवण्यासाठी पुजारा षटकार मारण्याचा कसून सराव करत आहे.
Puji was on fire ?@cheteshwar1 #csk pic.twitter.com/CNbPXi786q
— Ravi Desai ?? Champion CSK ?? (@its_DRP) March 30, 2021
धोनीच्या नेतृत्वात खेळणं माझ्यासाठी आनंदाचा क्षण
आयपीएलमध्ये पुनरागमन करताना मला खूप आनंद होतोय. चेन्नई सुपर किंग्स (Channai Super Kings) ही लीग दुनियातील बेस्ट लीग आहे. या संघाचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. त्यातही माही भाईच्या (MS Dhoni) कुशल नेतृत्वाखाली खेळायला मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असल्याच्या भावना चेतेश्वर पुजाराने व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाला चेतेश्वर पुजारा?
श्रीनिवासन यांच्या कौतुकावर बोलताना पुजाराने त्यांचे आभार मानले. हे खरोखर त्यांचं मोठेपण आहे. मी अशा टीमचा भाग आहे जी टीम आंतरराष्ट्रीय कसोटीतील्या प्रदर्शनाचा आदर करते. मी नशीबवान आहे की माही भाईच्या नेतृत्वाखाली मी खेळणार आहे. माझं आंतरराष्ट्रीय पदार्पण माही भाई कर्णधार असतानाच झालं होतं आताही आयपीएलमधलं माझं पुनरागमन माही भाईच्याच नेतृत्वाखाली होतंय, यापेक्षा आनंददायी काय असू शकते, अशा भावना पुजाराने व्यक्त केल्या.
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूविषयी एक मत तयार केलं जातं. छोट्या फॉरमॅटमध्ये त्याला फारशी संधी दिली जात नाही. अशात आपल्यातला खेळ दाखवण्याची कधी कधी संधीही मिळत नाही. आता माझ्या भावना आहेत की, आयपीएलच्या चेन्नई संघात मी अतिशय योग्य जागी आहे. मी संधी मिळताच योग्य प्रदर्शन करेल, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.
आयपीएलचं रण सज्ज
IPL 2021 Date And Schedule : इंडियन प्रीमयर लीगचं (the Indian Premier League) यंदाचं वेळापत्रक निश्चित झालं आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे.
(Chennai Super Kings Cheteshwar pujara net practice Six Video IPL 2021 MS Dhoni)
हे ही वाचा :
IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”
मोठी बातमी : भारत पाकिस्तान आमने-सामने येणार, एप्रिलमध्ये तिरंगी टी ट्वेन्टी मालिका