CSK Vs GT Pitch Report | चेन्नई विरुद्ध गुजरात महाअंतिम सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 सामन्यातही पाऊस झाला होता. त्यामुळे या सामन्याला विलंब झाला होता. आता पाऊस चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील अंतिम सामनाही....
अहमदाबाद | क्रिकेट चाहत्यांना अखेर 73 सामन्यांनंतर आयपीएल 16 व्या मोसमातील 2 अंतिम संघ ठरले आहेत. चेन्नई सुपर किंग्स टीमने गुजरात टायटन्स टीमवर क्वालिफायर 1 मॅचमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. तर या पराभवानंतर गुजरातने क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत अखेर फायनलमध्ये एन्ट्री केली. आता आयपीएल ट्रॉफीसाठी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात कडवी झुंज होणार आहे. या अटीतटीच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रंगत पाहायला मिळणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.
हवामान खात्याचा पावसाबाबत अंदाज काय?
चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्याबाबत हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज हा क्रिकेट चाहत्यांसाठी चिंताजनक आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र हा पाऊस दुपारी होईल असं म्हटलंय. मात्र हा दुपारचा पाऊसही संध्याकाळीही खोडा घालू शकतो. दुपारी होणारा पाऊस किती होईल तर किती होईल, असा सवालही क्रिकेट चाहत्यांना पडलाय. पावसामुळे आऊटफिल्ड ओली होण्याची भीती आहे. कारण आऊफिल्ड ओली झाल्यास सामना सुरु व्हायला विलंब होऊ शकतो.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
या 16 व्या मोसमात दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने आले आहेत. यात एक साखळी फेरीतील सामना होता. तर प्लेऑफ क्वालिफायर 1 या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांसमोर होते. या सामन्यात चेन्नईने गुजरातला पाणी पाजलं होतं. तर त्याआधी गेल्या हंगामातही दोन्ही टीम 2 वेळा भिडल्या होत्या. अशा प्रकारे या दोन्ही संघांमध्ये एकूण 4 वेळा आमनासामना झाला आहे. आकड्यांनुसार गुजरात चेन्नईवर वरचढ आहे. गुजरातने चेन्नईवर 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने गुजरातवर आयपीएल 2023 क्वालिफायर 1 मध्ये एकमेव विजय मिळवला.
आकड्यांमध्ये गुजरात वरचढ
चेन्नई विरुद्ध गुजरात एकूण सामने – 4
गुजरातने जिंकलेले सामने -3
चेन्नईने जिंकलेला सामना – 1
गुजरात आकड्यांच्या हिशोबाने टीम वरचढ असल्याचं स्पष्ट आहे. मात्र अंतिम सामन्यात काहीही उलटफेर होऊ शकतो. त्यामुळे आकड्यांवरुन कोणत्याही टीमला गृहीत धरणं चुकीच ठरेल. यामुळे आता अंतिम सामन्यात चेन्नई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार की गुजरात सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावरणार हे लवकरच स्पष्ट होईल .
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्स टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.