CSK vs SRH IPL 2022 : चेन्नईचा तिसरा विजय, ऋतुराज-कॉनवे आणि मुकेश चौधरी सामन्याचे हिरो, पाहा Highlights Video

कर्णधार होताच चेन्नई सुपर किंग्सचा मॅच विनर खेळाडू चांगलाच रंगात होता. त्याचं नाव आहे ऋतुराज गायकवाड हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो-धो धुतो.

CSK vs SRH IPL 2022 : चेन्नईचा तिसरा विजय, ऋतुराज-कॉनवे आणि मुकेश चौधरी सामन्याचे हिरो, पाहा Highlights Video
हैदराबाद विरुद्ध सीएसके जिंकला.Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 12:27 AM

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये 46वा सामना सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला गेला. नाणेफेक हरल्यानंतर पहिले फलंदाजीचा निर्णय सीएसकेनं घेतला. त्यानंतर चेन्नईने दोन गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या, तर डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर 203 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, हैदराबादला ते लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. हैदराबादने 20 षटकात 6 बाद 189 धावा केल्या. त्यामुळे तेरा धावांनी चेन्नई सुपर किंग्सचा विजय झालाय. आजचा सामना जिंकल्याने चेन्नई सुपर किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये आहे त्याच स्थानी आहे. मात्र, त्यांच्या खात्तात आणखी एका विजयाची भर पडली आहे. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र नुकसान सहन करावं लागलंय.

आणखी एका विजयाची भर

सीएसकेच्या विकेट्स, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

खेळतो नाही गोलंदाजांना धो-धो धुतो!

कर्णधार होताच चेन्नई सुपर किंग्सचा मॅच विनर खेळाडू चांगलाच रंगात होता. त्याचं नाव आहे ऋतुराज गायकवाड हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो-धो धुतो. जडेजाच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. पण, त्याने आज जे काही केलं. ते म्हणजे अफाट आणि सवोत्तम असं तुम्हीच म्हणाल. ऋतुराजने 12 चेंडूत तब्बल 60 धावा काढल्या. तर एकूण 57 चेंडूत त्याने तब्बल 99 धावा काढून आपला खरा रंग दाखवला. इतकंच नव्हे तर 6 चौकार आणि 6 षटकारही या मराठी मुलाने ठोकले. गायकवाडने डेव्हॉन कॉनवेसोबत पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारीही केली आणि चांगलाच चर्चेत आला. आता चहुकडे फक्त ऋतुराजच ऋतुराज होतंय. म्हणून हा खेळतो नाही तर गोलंदाजांना धो-धो धुतो म्हणावं लागेल.

ऋतुराज गायकवाडचे सह षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऋतुराज गायकवाडच्या सर्वाधिक 99 धावा

चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 203 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने दोन गडी गमावून 202 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 99 धावा केल्या. तर डेव्हन कॉनवे 85 धावांवर नाबाद राहिला. हैदराबादकडून टी नटराजनने दोन्ही विकेट घेतल्या.

डेव्हन कॉनवेच्या जोरदार धावा, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पॉईंट्स टेबलमध्ये काय?

आजचा सामना जिंकल्याने चेन्नई सुपर किंग्स पॉईंट्स टेबलमध्ये आहे त्याच स्थानी आहे. मात्र, त्यांच्या खात्तात आणखी एका विजयाची भर पडली आहे. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र नुकसान सहन करावं लागलंय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.