मुंबई : नुकतच IPL 2024 साठीच मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या रणनितीवर क्रिकेटच्या जाणकरांच बारीक लक्ष होतं. कारण मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील एक लोकप्रिय टीम आहे. ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवलं. त्याच्याजागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली. खरंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोठ यश मिळवलं. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएलच जेतेपद पटकावलं. चेन्नई आणि मुंबई या दोनच टीम्सना आयपीएलमध्ये सर्वाधिक पाचवेळा विजेतेपद पटकावता आलय. अन्य कुठलीही टीम या दोन फ्रेंचाजयींच्या आसपासही नाहीय. मुंबई इंडियन्सचा असा रेकॉर्ड असूनही त्यांनी रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याची नियुक्ती केली.
मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय अनेकांना पटलेला नाही. सोशल मीडियावर यावरुन अजूनही मोठा गहजब सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर अनेकजण प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. या निर्णयामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या फॉलोअर्सची संख्या सुद्धा घटली आहे. मुंबई इंडियन्स आणि खासकरुन रोहितचे चाहते नाराज आहेत. सोशल मीडियावर हा गहजब सुरु असताना आता टीमचे मालक आकाश अंबानी यांच एक स्टेटमेंट समोर आलय. मुंबईच्या फ्रेंचायजीने हा व्हिडिओ शेअर केलाय.
𝘊𝘩𝘪𝘯𝘵𝘢 𝘮𝘢𝘵 𝘬𝘢𝘳𝘰 𝘸𝘰𝘩 𝘣𝘢𝘵𝘵𝘪𝘯𝘨 𝘬𝘢𝘳𝘦𝘨𝘢 💙#OneFamily #MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/fNWLiWpgJS
— Mumbai Indians (@mipaltan) December 19, 2023
काय म्हणाले आकाश अंबानी?
‘चिंता करु नका, तो बॅटिंग करेल’, असं आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. या स्टेटमेंटचा अर्थ रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबत असणार, तो टीमसाठी आपल योगदान देणार असा आहे. नेतृत्वबदल झाला, तरी रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबतच असणार आहे. मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड माहेला जयवर्धने यांनी ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. हार्दिककडे गुजरात टायटन्सच यशस्वी नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याचा मुंबई टीमला फायदा होईल असं जयवर्धने यांचं मत आहे. मुंबई इंडियन्स भविष्याचा विचार करुन हा निर्णय घेतलाय. रोहित शर्माने आता वयाची पस्तीशी ओलांडली आहे. भविष्यात हार्दिककडेच टीम इंडियाच नेतृत्व सोपवल जाण्याची शक्यता आहे.