Video : ख्रिस गेलचा लेजेंड्स लीगमध्ये धमाका, बॅट तुटेपर्यंत ठोक ठोक ठोकला
क्रिकेटमध्ये चौकार षटकारांचा पाऊस कोणाला आवडत नाही. मग समोर ख्रिस गेल असला की उत्तुंग षटकारांचा मारा असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ख्रिस गेल निवृत्त झाला आहे. पण लेजेंड्स लीग त्याची बॅट अजूनही तळपत असल्याचं दिसून आलं आहे. मोठी इनिंग खेळताना ख्रिस गेलची बॅट तुटली. पण त्यानंतर ख्रिस गेलने आणखी आक्रमकपणे फलंदाजी केली.
मुंबई : क्रिकेटमध्ये ख्रिस गेल हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. गेल खेळपट्टीवर असला की एक दोन धावांपेक्षा चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहायला मिळतो. असंच काहीसं लेजेंड्स लीगमध्ये ख्रिस गेलने करून दाखवलं आहे. 27 चेंडूत ख्रिस गेलने धावांचा वर्षाव केला. ख्रिस गेलने महेंद्रसिंह धोनीच्या होमग्राउंड असलेल्या रांचीमध्ये धमाका केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आक्रमक अंदाज काही सोडलेला नाही. लेजेंड्स लीग क्रिकेटच्या चौथ्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्स यांच्यात सामना झाला. गुजरात जायंट्स संघ प्रथम फलंदाजीसाठी आला. सलामीला उतरलेल्या ख्रिस गेलने आल्याआल्या आपला आक्रमक अंदाज दाखवला. या दरम्यान एक उत्तुंग शॉट खेळताना बॅट तुटली आणि दोन भाग झाले. पण बॅट तुटली तरी ख्रिस गेलचा आक्रमक अंदाज काही संपला नाही. धडाकेबाज फलंदाजी करतच राहीला.
ख्रिस गेलने 27 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. त्याने 192.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भिलवाडा किंग्सचं पराभव निश्चित झाला. भिलवाडा किंग्सला या आक्रमक खेळीचा धावांचा पाठलाग करताना त्रास दिसून आला. भिलवाडा किंग्सला शेवटी 3 धावांनी पराभव सहन करावा लागला.
View this post on Instagram
ख्रिस गेलच्या आक्रमक खेळीमुळे गुजरात टायटन्सने 20 षटाकत 6 गडी गमवून 172 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भिलवाडा किंग्सकडून लेंडल सिमंसने आक्रमक खेळी केली. त्याने 61 चेंडूत 99 धावा केल्या. पण गेलने 27 चेंडूत केलेल्या 54 धावा भारी पडल्या. कारण सरते शेवटी 3 धावांनी पराभव सहन करावा लागला.
Universe Boss: Breaking bats and records since forever! ..#LegendsOnFanCode @llct20 @giants_gujarat @henrygayle pic.twitter.com/w2Qimp2xqO
— FanCode (@FanCode) November 22, 2023
दोन्ही संघाचे खेळाडू
गुजरात टायटन्स : ख्रिस गेल्स, जॅक कॅलिस, रिचर्ड लेवी, केविन ओब्रायन, पार्थिव पटेल, अभिषेक झुंझुनवाला, चिराग खुराना, रजत भाटीया, रयाद इम्रित,श्रीशांत, सरबजीत लड्डा.
भिलवाडा किंग्स : सोलोमन मिरे, तिलकरत्ने, लेंडल सिमॉन्स,रॉबिन बिस्ट, पिनल शाह, युसूफ पठाण, इरफान पठाण, ख्रिस बार्नवेल, जेसल करिया, अनुरीत सिंग, रायन साइटबॉटम.