रणजी ट्रॉफीत तामिळनाडूच्या पराभवाचं खापर कोचने या खेळाडूच्या माथी फोडलं, सरळ सांगितलं काय ते
रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईने तामिळनाडूला पराभूत अंतिम फेरी गाठली आहे. मात्र तामिळनाडूच्या पराभवावरून आता वादाला फोडणी मिळाली आहे. आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. कोण चूक कोण बरोबर असा प्रश्न आता क्रीडारसिकांसमोर उभा राहिला आहे.
मुंबई : रणजी स्पर्धेत उपांत्य फेरीचा सामना मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात रंगला. या सामन्यात मुंबईने बाजी मारली आणि अंतिम फेरी गाठली आहे. पण तामिळनाडूच्या पराभवावरून आता वादाला फोडणी मिळाली आहे. तामिळनाडूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ 146 धावांवर तंबूत परतला. तर पहिल्या डावात मुंबईने सर्वबाद 378 धावा केल्या. तसेच सामन्यात 232 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना तामिळनाडूची फलंदाजी ढासळली. तामिळनाडूचा संपूर्ण संघ 162 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे मुंबईने 70 धावांनी तामिळनाडूवर विजय मिळवला. आता अंतिम फेरीत मुंबईचा सामना मध्य प्रदेशसोबत होणार आहे. असं असताना तामिळनाडूच्या उपांत्य फेरीतील पराभवाचं खापर प्रशिक्षकाने थेट कर्णधाराच्या माथ्यावर फोडलं आहे. त्याला सांगितलं एक आणि केलं दुसरंच असा थेट आरोप केला आहे. प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितलं की कर्णधाराने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यामुळेच ही वेळ आली.
प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितलं की, ‘आम्ही सेमीफायनल पहिल्याच दिवशी सकाळी 9 वाजता हारलो होतो. कारण टीमचा कर्णधार साई किशोरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मानसिकरित्या आम्ही तयार होतो की जो टॉस जिंकेल तो प्रथम गोलंदाजी घेईल. पण कर्णधाराने काही वेगळाच विचार केला होता.’ साई किशोरने या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 32 षटक टाकत पाच गडी बाद केले होते.
ईएसपीएनक्रिकइंफोच्या मते, उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितलं की, ‘मी कायम सरळ स्पष्ट सांगतो. आम्ही पहिल्याच दिवशी सकाळी 9 वाजता सामना हरलो होतो. मी विकेट पाहिली होती. त्यामुळे आमच्या नशिबात काय येणार याचा अंदाज आला होता. सर्वकाही ठीक होतं आणि आम्ही टॉस जिंकला होता. प्रशिक्षक आणि मुंबईकर म्हणून स्थितीचा अंदाज होता. आम्हाला गोलंदाजी निवडायला हवी होती. पण कर्णधाराने काही वेगळाच विचार केला होता.’
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
तामिळनाडू : साई सुदर्शन, नारायण जगदीसन (विकेटकीपर), प्रदोष पॉल, रविश्रीनावसन साई किशोर (कर्णधार), बाबा इंद्रजीत, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजिथ राम, संदीप वॉरियर, कुलदीप सेन
मुंबई : पृथ्वी शॉ, भुपेन ललवानी, मुशीर खान, मुशीर खान, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकुर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शम्स मुलानी, हार्दिक ठोमरे, तनुश कोटियन, तुषार देशपांडे.