‘सहा ते सात वेळा बाद करू शकलो असतो..’, बुमराहने कोनस्टासबाबत केलं मोठे वक्तव्य
ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या सॅम कोनस्टासने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून आपला हेतू स्पष्ट केला. जसप्रीत बुमराहविरुद्ध केलेले फटकेबाजीही जबरदस्त होती. असं असताना जसप्रीत बुमराहने मोठं विधान केलं आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या पारड्यातील सामना आपल्याकडे खेचून आणला आहे. दुसऱ्या दिवशी भारताने पाच गडी गमवले तेव्हा ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड होती. पण टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी कमबॅक करत 358 धावा केल्या. अजूनही भारताकडे एक गडी असून 116 धावांची आघाडी कमी करण्याची संधी आहे. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी या कसोटीत जबरदस्त खेळी केली. असं असताना पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा 19 वर्षीय सॅम कोनस्टास चर्चेत राहिला. त्याने 65 चेंडूत 60 धावांची खेळी केली तसेच जसप्रीत बुमराहला दोन षटकार मारले. पण असं असताना जसप्रीत बुमराहने सांगितलं की, त्याला असं कधीच वाटलं नाही की तो विकेटपासून दूर आहे. जसप्रीत बुमराहने एका चॅनेलसोबत चर्चा करताना गोलंदाजीचे पत्ते खुले केले.
‘मी त्या गोष्टींकडे त्या नजरेने पाहात नाही. मी चांगली गोलंदाजी करत आहे आणि निकाल माझ्या बाजून लागत आहे. मी वेगवेगळ्या ठिकामी चांगली गोलंदाजी केली आहे. क्रिकेटमध्ये अनेकदा असं होतं की आपल्याला विकेट मिळते, पण कधी चांगली गोलंदाजी करूनही विकेट मिळत नाही. सर्वकाही ठिक असतं. मी 12 वर्षांपेक्षा जास्त काळ टी20 खेळलो आहे आणि याचा मला चांगला अनुभव आहे.’, असं जसप्रीत बुमराहने सांगितलं.
When Bumrah talks, everyone hears – A brilliant interview with the best Player in the current Generation. 🐐 pic.twitter.com/bD01Mi2cGK
— Johns. (@CricCrazyJohns) December 28, 2024
‘तो (कोनस्टास) एक चांगला फलंदाज आहे. पण मला विकेटपासून दूर आहे अजिबात वाटलं नाही. सुरुवातीला मला वाटलं की पहिल्या दोन षटकात मी त्याला सहा ते सात वेळ बाद करू शकेन. पण क्रिकेटमध्ये असंच घडतं. अनेक वेळा विकेट मिळते. पण जेव्हा विकेट मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीवर टीका करता. मला नवीन आव्हानांचा सामना करणं आवडतं.’, असं जसप्रीत बुमराहने सांगितलं.
बुमराहने सांगितलं की, ‘मी ऑस्ट्रेलियात कायम सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो. मी येथे 2018 मध्ये पहिला कसोटी सामना खेळलो होतो आणि 2016 मध्ये वनडे डेब्यू केला होता. येथे बरीच आव्हाने आहेत कारण विकेट सपाट आहेत आणि कूकाबुरा नवीन चेंडूला मदत करतो पण नंतर नाही. त्यामुळे तुमची अचूकता तपासली जाते. हवामान तुमच्या तंदुरुस्तीची आणि संयमाची चाचणी घेते. एकदा का तुम्ही या आव्हानांवर मात केली की तुम्ही एक चांगला क्रिकेटर बनता. ‘