Watch : वजनदार खेळाडूला एक धाव घेणंही झालं कठीण, फटका मारला आणि जागेवर करत होता जॉगिंग Video Viral
CPL 2023: वेस्ट इंडिजच्या रहकीम कॉर्नवॉल हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचा रनआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बघा नेमकं काय झालं.
मुंबई : वेस्ट इंडिजची कॅरेबियन लीग सध्या नव्या नियमांसह कॉर्नवॉलच्या रनआऊटमुळे चर्चेत आहे.कॅरेबियन प्रीमियर लीग 2023 मध्ये बारबाडोस रॉयल्स विरुद्ध सेंट लूसिया किंग्स यांच्यात सामना पार पडला. सेंट लुसिया किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंट लुसिया किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान बारबाडोस रॉयल्ससमोर ठेवलं. या विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी बारबाडोस रॉयल्सकडून रहकीम कॉर्नवॉल आणि कायल मेयर्स ही जोडी मैदानात उतरली. पण पहिल्याच चेंडूवर बारबाडोसला फटका बसला.
नेमकं काय झालं ते पाहा
रहकीम कॉर्नवॉल हा त्याच्या वजनामुळे चर्चेत आहे. 140 किलो वजन असल्याने त्याच्याबाबत चर्चा होत असते. विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी कॉर्नवॉल याने पहिल्याच चेंडूवर जोरदार फटका मारला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या ख्रिस सोल याच्या हातून चेंडू सुटला आणि कॉर्नवॉल-मेयर्स यांनी एक धावा घेण्याचा निश्चय केला. पण हा कॉल कॉर्नवॉल याच्या अंगाशी आला.
A Rahkeem Cornwall Run Out In CPL.pic.twitter.com/36ASQ2tBkF
— Aadarsh (@AadarshParab) August 18, 2023
ख्रिस सोलने नॉन स्ट्राईकला धाव घेणाऱ्या कॉर्नवॉल याला बरोबर हेरलं आणि स्टंपवर बॉल फेकला. कारण वजनदार कॉर्नवॉल जागेवर धावत होता. ख्रिस सोलचा चेंडू थेट स्टंपवर आदळला आणि कॉर्नवॉल याला थेट तंबूत पाठवलं. दुसरीकडे मेयर्स स्ट्राईकला जाऊन क्रिस उभं होता तरी कॉर्नवॉल मधेही पोहोचला नव्हता.
कॉर्नवॉल रनआऊट झाल्यानंतर त्याला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. कॉर्नवॉल पहिल्याच चेंडूवर आऊट झाल्याने संघाला फटका बसला. यंग व्यतिरिक्त एकही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. यंगने 48 धावांची खेळी केली. बारबाडोस रॉयल्स संपूर्ण संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. हा सामना सेंट लूसिया किंग्सने 54 धावांनी जिंकला.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
सेंट लुसिया किंग्स – जॉन्सन चार्ल्स, फाफ डु प्लेसिस, सॅड्रॅक डेस्कार्टस, सीन विलियम्स, सिकंदर राजा, रोस्टन चेस, रोशोन प्रिमस, मॅथ्यू फोर्डे, खॅरी पिरे, ख्रिस सोल, अल्झारी जोसेफ
बारबाडोस रॉयल्स – रहकीम कॉर्नवॉल, कायल मेयर्स, जस्टीन ग्रीव्ह्स, केविन ओमन विकहम, रोव्हमॅन पॉवेल, जेसन होल्डर, डोनोवन फेरेरा, नयीम यंग, कयास अहमद, जोशुआ बिशअप, ओबेड मॅककॉय