IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी येऊ देणार की नाही?, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण

यपीएल स्थगित झाल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात एन्ट्री दिली जाणार की नाही?, ते मायदेशी रवाना होऊ शकणार की नाही? याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. (Cricket Australia big Statement Ausralian Player returns Over IPL 2021 Suspended)

IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी येऊ देणार की नाही?, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण
ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतण्याविषयी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण...
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 8:12 AM

मुंबई : कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियन सरकारने तर अतिशय कडक निर्बंध लागू केले आहेत. अशावेळी आयपीएल स्थगित झाल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात एन्ट्री दिली जाणार की नाही?, ते मायदेशी रवाना होऊ शकणार की नाही? याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. (Cricket Australia big Statement Ausralian Player returns Over IPL 2021 Suspended)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय स्पष्टीकरण दिलंय…?

“ऑस्ट्रेलियन सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया पावलं उचलेल. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांना प्रतिबंध घातला आहे. खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यातून सूट मागणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या साथीने आयपीएल स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी कसं आणता येईल, यासंबंधी विचार करेल आणि आवश्यक तशी पावलं उचलेल”, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.

आयपीएलचा बायो-बबल छेदत कोविड संसर्गाच्या अनेक घटना घडल्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) संयुक्त निवेदनात म्हटलंय की, “ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करुन योग्य प्लॅन आखला जाईल आणि त्यांच्या मायदेशी परतण्याविषयी निर्णय घेतला जाईल”

“क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) ऑस्ट्रेलियन सरकारने घालून दिलेल्या नियमांचा आदर करते. आम्ही खेळाडूंसाठी सरकाकडून कोणतीही सूट मागणार नाही. बीसीसीआयच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यांच्या साथीने आम्ही लवकरच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मायदेशी परतण्याविषयी प्लॅन बनवू”, असं क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) संयुक्त निवेदनात म्हटलंय.

ऑस्ट्रेलियाचे कोणकोणते खेळाडू भारतात अडकलेत…?

पॅट कमिन्स आणि बेन कटिंग ग्लेन मॅक्सवेल आणि डॅनियल सॅम्स नॅथन कुल्टर नाईल आणि ख्रिस लिन जेसन बेहरनडॉर्फ आणि डेव्हिड वॉर्नर

(Cricket Australia big Statement Ausralian Player returns Over IPL 2021 Suspended)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएल स्थगित, कोणकोणते विदेशी खेळाडू भारतात अडकलेत?, वाचा संपूर्ण यादी….

PHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित

IPL 2021 ला स्थगिती, खेळाडूंच्या मानधनात कपात, आता कोणाला किती रक्कम मिळणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.