WTC 2023 : बीसीसीआय आयपीएलमध्ये व्यस्त असताना ऑस्ट्रेलियाने डाव साधला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आखली अशी रणनिती

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आतापासून मोर्चेबांधणी सुरु आहे. दुसरीकडे, बीसीसीआय खेळाडूंची निवडीबाबत अजूनही संभ्रमात असल्याचं चित्र आहे.

WTC 2023 : बीसीसीआय आयपीएलमध्ये व्यस्त असताना ऑस्ट्रेलियाने डाव साधला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आखली अशी रणनिती
WTC 2023 : भारतीय खेळाडू आयपीएल खेळत असताना ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी व्यूहरचना, या खेळाडूमुळे डोकदुखी वाढणारImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 1:36 PM

मुंबई : दोन वर्षांच्या टेस्ट कसोटीतील गुणांवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा, तर भारताने अंतिम फेरीत दुसऱ्यांदा धडक मारली आहे. भारतात सध्या आयपीएल 2023 स्पर्धा ऐन रंगात आली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. तसेच अष्टपैलू मिचेल मार्शचं संघात पुनरागमन झालं आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना 2019 मध्ये खेळला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नेथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि डेविड वॉर्नर.

भारतीय संघाची स्थिती

केएल राहुल आणि केएस भारतला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळणं कठीण आहे. ऋषभ पंतला जबर दुखापत झाल्याने तो काही फीट होईल असं चित्र नाही.जसप्रीत बुमराह कमबॅक करेल अशी तीळमात्र शक्यता नाही. त्यामुळे हा पर्याय देखील उरणार नाही. त्यामुळे उमेश यादवचं संघातील स्थान निश्चित आहे, असंच म्हणावं लागेल.

श्रेय्यस अय्यरही पाठीच्या दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. त्यामुळे काही खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच शुभमन गिलचा फॉर्म पाहता त्याला संघात स्थान मिळेल. तसेच अजिंक्य रहाणे श्रेयस अय्यरच्या जागी पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांचा देखील विचार केला जाऊ शकतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अशी असू शकते टीम इंडिया

संभावित टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, ईशान किशन/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, दीपक चाहर/सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कधी ?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी आयसीसीने 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.