ऑलिम्पिक 2028 पूर्वी क्रिकेटला मोठा धक्का! या स्पर्धेतून खेळ ‘आऊट’
भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जीव की प्राण असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण क्रिकेटचे सामने पाहण्याची क्रेझ अजूनही कायम आहे. असं असताना भारतीय क्रीडारसिकांना एक धक्का बसला आहे. क्रिकेट खेळाला मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे.
ऑलिम्पिक 2028 स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याने आनंदाचं वातावरण आहे. त्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. चार वर्षानंतर ही स्पर्धा होणार आहे. सुवर्ण पदकावर मोहोर कोण उमटवणार याची उत्सुकता लागून आहे. असं असताना भारतीय क्रीडारसिकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2026 पूर्वी भारताचं मोठं नुकसान झालं आहे. ग्लासगो येथे होणाऱ्या पुढच्या कॉमनवेल्थ गेम्समधून सहा खेळ वगळण्यात आले आहेत. यात क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, स्क्वाश, टेबिल टेनिस आणि कुस्तीचा समावेश आहे. खरं तर यापैकी तीन खेळात भारताला पदकाची आशा होती. इतकंच काय तर मागची कॉमनवेल्थ स्पर्धा इंग्लंडच्या बर्मिंघम येथे पार पडली होती. या स्पर्धेत तिरंदाजी आणि नेमबाजी हा प्रकार नव्हता. पुढच्या स्पर्धेतही हे खेळ नसणार आहेत. इतके सारे खेळ स्पर्धेतून वगळण्याचं प्रमुख कारण आर्थिक आहे. बर्मिंघ कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने 61 पदकं जिंकली होती. यात कुस्तीत 12, वेट लिफ्टिंगमध्ये 10, एथलेटिक्समध्ये 8, बॉक्सिंग आणि टेबल टेनिसमध्ये प्रत्येकी 7 पदकं जिंकली होती. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाने रौप्य पदक जिंकलं होतं.
कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेचं आयोजन सिडनीत होणार होतं. पण ऑस्ट्रेलियाने आर्थिक कारण पुढे करत हात आखुडते घेतले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा ग्लासगोत आयोजित करण्याच ठरलं आहे. आर्थिक गणित जुळवताना ग्लासगोन एक प्लान तयार केला. तसेच कॉमनवेल्थ फेडरेशनने त्याला मान्यताही दिली आहे. भारताने हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन, शूटिंगसारख्या खेळात सर्वाधिक पदकं मिळवली आहेत. शूटिंगमध्ये भारताने 135 पदक मिळवली आहे. बॅडमिंटनमध्ये भारताने 31 मेडल जिंकले आहेत. कुस्तीत भारताने 114 मेडल जिंकले आहेत. हॉकीत पाच पदकं आणि महिला हॉकित 3 पदकं मिळवलेत.
कॉमनवेल्थ गेम्सने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, ‘ग्लासगो सीडब्ल्यूजी आयोजकांनी सांगितलं की, खेळाच कार्यक्रमात अथलेटिक्स आणि पॅरा अथलेटिक्स, बॉक्सिंग, बाउल्स आणि पॅरा बाउल्स, जलतरण आणि पॅरा जलतरण स्पर्धा, जिम्नॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेट लिफ्टिंग आणि पॅरा वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, ज्युडो, 3X3 बास्केटबॉल आणि 3X3 व्हिलचेअर बास्केटबॉल स्पर्धा असतील.’