Cricket Rules : आता टॉसनंतरही कॅप्टनला बदलता येणार प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता टॉसनंतरही कॅप्टनला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करता येणार आहे.

Cricket Rules : आता टॉसनंतरही कॅप्टनला बदलता येणार प्लेइंग इलेव्हन
Image Credit source: bcci
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 6:34 PM

Cricket News : आयपीएल क्रिकेट लीगला (IPL) क्रिकेट चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालंय. त्यामुळे आता प्रत्येक क्रिकेट बोर्ड आयपीएलच्या पार्श्वभूमीवर ट्वेंटी ट्वेंटी लीगचं आयोजन करतंय. दक्षिण आफ्रिकेत मंगळवार 10 जानेवारीपासून साउथ आफ्रिका टी 20 लीग (SA T20 Cricket League) स्पर्धेला सुरुवात झालीय. प्रत्येक लीग क्रिकेट स्पर्धा ही नियमांनुसारच खेळवण्यात येते. मात्र या स्पर्धेत नवा नियम लागू झाला आहे. हा नियम स्पर्धेतील सहभागी संघांसाठी फायदेशीर ठरु शकतो. (cricket rules now captain will be change playing eleven afeter toss south africa t20 league know details)

दक्षिण आफ्रिका टी 20 क्रिकेट लीगमध्ये मोठा बदल करण्यात आहे. हा बदल टीम प्लेइंग इलेव्हन संदर्भात आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या नव्या नियमांनुसार सर्व संघांना टॉसनंतरही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की पूर्णच टीम बदलता येईल. आपण हा नियम उदाहरणाद्वारे जाणून घेऊयात. क्रिकेटच्या नियमांनुसार टॉस दरम्यान कॅप्टन टीम प्लेइंग इलेव्हनबाबत माहिती द्यावी लागते.

हे सुद्धा वाचा

दक्षिण आफ्रिकेच्या नव्या नियमांनुसार, दक्षिण आफ्रिका टी 20 लीग स्पर्धेत कॅप्टन टॉसनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल करु शकतो. हे 2 खेळाडू सब्टीट्यूड म्हणूनच प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होतील. नियमांनुसार, कॅप्टनला टॉसआधी 13 खेळाडूंना नॉमिनेट करायचं असतं. टॉसनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करता येत नाही. जे 2 खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये नसतील, ते सब्टीट्यूड असतील.

दरम्यान साऊथ आफ्रिका टी 20 लीग स्पर्धेला 10 जानेवारीपासून सुरवात झाली. स्पर्धेतील सलामीचा सामना एमआय केपटाऊन विरुद्ध पार्ल रॉयल्स यांच्या खेळवण्यात आला. पहिल्या सेमीफायनमध्ये चौथ्या स्थानी असलेला संघाविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघाचा सामना होईल. तर दुसरी सेमी फायनल अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या टीममध्ये होईल. तर सेमी फायनलमधील विजेता संघ विजेतेपदासाठी भिडतील.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.