Pune : मोठी बातमी | टीम इंडियाच्या मराठमोळ्या खेळाडूचे वडील पुण्यातील ‘या’ ठिकाणाहून बेपत्ता, क्रिकेट विश्वात खळबळ
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. केदार जाधवने आपल्या इन्टाग्रामवर स्टोरी ठेवली असून त्यामध्ये वडील महादेव जाधव हे कोथरूडमधून हरवले असल्याचं सांगितलं आहे.
इन्टाग्रामवर स्टोरीमध्ये नेमकं काय?
केदार जाधवने आपले वडील महादेव दादा जाधव वय अंदाजे 85, 27 मार्च 2023 ला सकाळी 11.30 फिरायला गेले असता स्मृतीभ्रंशामुळे कोथरूड येथून हरवले आहेत. सापडल्यास तात्काळ संपर्क करा, असं त्याने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे. यामध्ये त्याने संपर्क क्रमांक दिला असून 8530444472 यावर संपर्क साधायला सांगितला आहे.
यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सकाळी महादेव जाधव हे द पॅलेडियमन, सिटी प्राईड कोथरूडमधून रिक्षात बसून गेल्याची माहिती समजत आहे. मात्र आत्तापर्यंत काहीच शोध लागलेला नसून त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत आहे. पोलिसांनीही कोणाला ते आढळल्यास संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे.
दरम्यान, केदार जाधवने एकूण 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि 73 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जाधवने दोन्ही फॉरमॅटमध्ये 20 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. केदारला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. खराब कामगिरीमुळे त्याला 2020 मध्येच टीम इंडियातून वगळण्यात आलं होते. तेव्हापासून केदार जाधवला टीम इंडियामध्ये जागा मिळवू शकला नाही.