2011 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन

टीम इंंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य पियूष चावलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पीयूषचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले आहे. (Cricketer Piyush Chawla Father Pramod Kumar Chawala Passed Away Due To Corona)

2011 च्या वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन
पीयूष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले आहे.
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 12:33 PM

मुंबई : टीम इंंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फिरकीपटू पियूष चावलावर (Piyush Chawla) दुखाचा डोंगर कोसळला आहे. पीयूषचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे आज (10 मे) कोरोनामुळे निधन झाले आहे. स्वत: पियूषने इंस्टाग्रामद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. तसंच मुंबई इंडियन्सने देखील ट्विट करुन पीयूषच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. (Cricketer Piyush Chawla Father Pramod Kumar Chawala Passed Away Due To Corona)

प्रमोद कुमार चावला यांचं कोरोनाने निधन

प्रमोद कुमार चावला (Pramod Kumar Chawla) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. गेल्या काही दिवस त्यांचा कोरोनाविरोधी लढा सुरु होता. मात्र त्यांना कोरोनावर मात करण्यात अपयश आलं. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबई इंडियन्सची ट्विटरद्वारे श्रद्धांजली

पियूष चावला याचे वडील प्रमोद कुमार चावला यांचं कोरोनाने निधन झालंय. आम्ही या कठीण प्रसंगी पियूष आणि त्याच्या कुटुंबासोबत आहोत, अशा भावना मुंबई इंडियन्सने ट्विट करुन व्यक्त केल्या आहेत.

पियूषची आयपीएल कारकीर्द

आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्सने पियूषला 2 कोटी 40 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. स्पर्धा रद्द होण्यापर्यंत मुंबईने 7 सामने खेळले. पण त्यात पियूषला संधी मिळाली नाही. याआधी पियूषने कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केलं आहे.

कोलकाताने 2014 मध्ये जेतेपद पटकावलं होतं. पियूष या संघाचा सदस्य होता. दरम्यान 2019 मध्ये कोलकाताने त्याला करारमुक्त केलं. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्याला संधी दिली. पियूषसाठी सीएसकेने 6 कोटी 75 लाख मोजले.

चेतन साकरियाच्या वडिलांचं कोरोनाने निधन

दरम्यान, रविवारी 9 मे रोजी राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंगाज चेतन साकरियाच्या वडीलांनाही कोरोनामुळे प्राण गमावावे लागले. साकरियाने आयपीएलमधून मिळालेली सर्व रक्कम पणाला लावली. बाबांना वाचवण्यासाठी त्याने शक्य ते प्रयत्न केले. मात्र त्यांनी रविवारी जगाचा निरोप घेतला.

चेतन साकरियाने आयपीएलमधून मिळालेला सगळा पैसा खर्च वडिलांच्या उपचारावर खर्च करण्यायी तयारी दाखवली होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळं होतं. चेतनला वडिलांना वाचवण्यात अपयश आलंय. वडिलांच्या जाण्याने चेतनवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना भावनगरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहिले काही दिवस त्यांनी उपचारांना योग्य प्रतिसाद दिला. मात्र नंतर त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर आज दुपारी त्यांना कोरोनाने हिरावून नेलंय.

(Cricketer Piyush Chawala Father Pramod Kumar Chawala Passed Away Due To Corona)

हे ही वाचा :

IPL चा सर्व पैसा खर्च करण्याची तयारी, तरीही पित्याला वाचवण्यात अपयश, युवा क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.