जंगलात सापडला खेळाडूचा मृतदेह, क्रिकेट विश्वावर शोककळा
महिला क्रिकेटपटू गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर ही वाईट बातमी समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात विविध कंगोरे लक्षात घेत सखोल तपास केला जात आहे.
मुंबई : क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. महिला क्रिकेटपटूचा झाडाला लटकलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे. त्यामळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. महिला क्रिकेटपटू गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर ही वाईट बातमी समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात विविध कंगोरे लक्षात घेत सखोल तपास केला जात आहे.
ओडीसाची महिला क्रिकेटर राजश्री स्वांई 11 जानेवारीपासून बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी 13 जानेवारीला कटकनजीकच्या जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत राजश्रीचा मृतदेह आढळला. राजश्रीचा मृतदेह हा अथागडमधील गुरुदिझाटिया जंगलात एका झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती, कटकचे पोलीस उपायुक्त पिनाक मिश्रा यांनी दिली.
SHOCKING NEWS:
Odisha woman cricketer Rajashree Swain was found hanging from a tree in Gurudijhatia forest.
Family members have put allegations against Odisha Cricket Association (OCA) and the coach of the women’s team, Pushpanjali Banerjee.#CricketTwitter Source: OdishaTV pic.twitter.com/TXGgUITuO1
— Female Cricket (@imfemalecricket) January 13, 2023
राजश्रीच्या प्रशिक्षकांनी गुरुवारी कटकमधील मंगलाबाग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली. राजश्रीच्या मृत्यूची गुरुदिझाटिया पोलीस चौकीत अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाल्याची माहिती प्रशिक्षकानी दिली.
परिवाराकडून हत्येचा आरोप
पोलिसांना आतापर्यंत राजश्रीच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र राजश्रीच्या कुटुंबियांकडून हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जेव्हा आम्ही राजश्रीचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या शरीरावर जख्मा होत्या. तसेच राजश्रीच्या डोळ्यांनाही इजा झाल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. राजश्रीची स्कूटर जंगलाजवळ मिळाली होती. तर मोबाईलही स्वीच ऑफ होता. पोलिसांनी या प्रकरणात प्रत्येक कंगोरा पडताळून पाहणार असल्याचं म्हटलंय.
राजश्री ही ओडीसा क्रिकेट संघाच्या एका शिबिरात सहभागी झाली होती. राजश्रीसह एकूण 25 महिला क्रिकेटपटूंच्या सराव शिबिराचं ओसीएकडून बाजाराकाबाटी इथे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं आयोजन हे पुद्देचरीत होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या उद्देशाने करण्यात आलं होतं. सर्व महिला क्रिकेटपटू एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. ओडिसा राज्य महिला क्रिकेट टीमची घोषणा 10 जानेवारीला करण्यात आली. मात्र या अंतिम यादीत राजश्रीचा समावेश करण्यात आला नव्हता. दरम्यान आता पोलिसांकडून या प्रकरणात खोलात जावून तपास केला जात आहे.