बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड?; ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Cricketer Smriti Mandhana Rumoured Boyfriend Palaash Muchhal : वुमन प्रीमियर लीग 2024 आरसीबीच्या टीमने जिंकली. या टीमची कॅप्टन स्मृती मानधना सध्या चर्चेत आहे. तिच्या खेळासोबतच तिच्या एका फोटोचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. एका गायकासोबतचा स्मृतीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड?; 'त्या' फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 1:42 PM

मुंबई | 18 मार्च 2024 : WPL 2024 अर्थात वुमन प्रिमियर लीगची फायनल झाली आहे. यंदाची ट्रॉफी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमने जिंकली. आरसीबी आणि दिल्ली कॅपिटलमध्ये फायनल मॅच झाली. आठ विकेटने आरसीबीने दिल्लीच्या टीमला हरवलं. दिल्ली कॅपिटलने सुरुवातीला बॅटिंग केली. 113 धावांचं टार्गेट त्यांनी आरसीबीला दिलं. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीने दोन विकेट गमावल्या. पण अखेर ही मॅच जिंकली. या मॅचनंतर आरसीबीची कॅप्टन स्मृती मानधना हिचं सर्वत्र कौतुक होतंय. सोशल मीडियावर स्मृती मानधनाचीच चर्चा पाहायला मिळतेय. या चर्चांमध्ये स्मृतीचा एक फोटोही प्रचंड व्हायरल होत आहे.

‘तो’ फोटो प्रचंड व्हायरल

आरसीबीने WPL 2024 चं जेते पद पटकावल्यानंतर स्मृतिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पण बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकाने स्मृती सोबतचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. गायक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याने WPL 2024 चा कप हातात घेतलेला फोटो शेअर केलाय. या फोटोत स्मृतीदेखील दिसते आहे. त्यामुळे हा स्मृतीचा बॉयफ्रेंड असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.

स्मृती आणि पलाश यांचं नातं

पलाश आणि स्मृती दोघे चांगले मित्र आहेत. आधीपासून दोघे एकमेकांसोबत दिसतात. याआधीही पलाशने स्मृतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पण आत क्रिकेटच्या मैदानावरचा शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचंही बोललं जात आहे. या फोटोवरही अनेकांनी कमेंट करत दोघांनी त्यांच्या नात्याबाबत प्रश्न विचारला आहे. दरम्यान स्मृतीने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण आहे स्मृती मानधना?

स्मृती मानधना मूळची सांगलीची आहे. अवघ्या 27 वर्षांची असणारी स्मृती तिच्या खेळीमुळे देशभरात चर्चेत असते. तिची खेळी तिचा अंदाज क्रिकेट प्रेमींना भावतो. लहानपणापासूनच ती क्रिकेट खेळते. आधी घरीच वडिलांनी तिला क्रिकेट शिकवलं. नंतर सांगलीच्या क्रिकेट अॅकॅडमीमध्ये ती दाखल झाली. अवघ्या नवव्या वर्षी ती अंडर 15 सामन्यांसाठी मैदानात उतरली. आज महिला क्रिकेट मध्ये तिचं मोठं नाव आहे. आरसीबीने WPL 2024 जिंकण्यात तिचा मोठा वाटा आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.