अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एकमेव कसोटी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सामना ग्रेटर नोएडा भागात होत आहे. पण पाऊस आणि त्यानंतर मैदानाची स्थिती पाहता हा सामना दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्याची वेळ आली. 9 सप्टेंबरला सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आणि पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु करण्यापूर्वी मैदानाची स्थिती एकदमच वाईट झाली होती. ओल्या आउटफिल्डमुळे सामना खेळवणं कठीण झालं होतं. मैदानातील ओलावा दूर करण्यासाठी ग्राउंड्समॅनने विचित्र पद्धती अवलंबल्या. अनेकांना याबाबत आश्चर्यही वाटलं. कारण ग्राउंड्समॅननी मैदानातील ओल्या भागातील पॅच चक्क खोदून काढले. तसेच नेट प्रॅक्टिस भागातील सुके पॅच तिथे आणून लावताना दिसले.यापूर्वीही ग्राउंडसमॅन वेगवेगळ्या पद्धतीने मैदान सुकवण्याचे प्रयत्न करताना पाहिले गेले आहेत. पण असं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळालं. त्यामुळे क्रिकेटच्या देशात मैदानं सुकवण्यासाठी अद्ययावत प्रणाली नसणं यासारखं दुर्दैव नाही अशी टीका क्रीडाप्रेमी करत आहेत.
मैदानाची स्थिती पाहून अफगाणिस्तानचे खेळाडू पुरते निराश झाल्याचं पाहायला मिळालं. तर न्यूझीलंडच्या खेळाडूंना एकंदरीत स्थिती पाहून धक्का बसला. मिड ऑन आणि मिड विकेटजवळ खूपच ओला पॅच आहे. हा भाग सुकवण्यासाठी ग्राउंड्समॅन टेबल फॅनचा वापर करताना दिसले. आयोजक अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमात्र कसोटी सामन्यासाठी योग्य सुविधा देऊ शकले नसल्याची टीका होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल हे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अनफिट घोषित करू शकते.
Not a good morning from Greater Noida! They have dug a part of the midwicket area and are trying to fix it with some dry patches of grass and soil. Something new I have seen in cricket.#AFGvNZ pic.twitter.com/46ZwYZoqmQ
— Daya sagar (@sagarqinare) September 10, 2024
Cut-Paste#AFGvNZ pic.twitter.com/VOwcBzwgBj
— Daya sagar (@sagarqinare) September 10, 2024
Now, they are bringing dry grass patches to fill the dug area and on the other side they have brought fans to dry the damp patches. Teams are still in the hotel. 12pm is inspection time!#NZvAFG https://t.co/h201nuzRTQ pic.twitter.com/oMLl5eByuK
— Daya sagar (@sagarqinare) September 10, 2024
Now the fans are out at the other side of the wicket. #AFGvNZ pic.twitter.com/gsDi5idyWa
— Daya sagar (@sagarqinare) September 10, 2024
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्डाने 2015 मध्ये एक करार केला होता. यात अफगाणिस्तानने होम मॅच खेळण्यासाठी भारताची निवड केली होती. या करारानुसार अफगाणिस्तानने ग्रेटर नोएडा, देहारादून आणि लखनौमध्ये सामने खेळले, असं निश्चित झालं होतं. जर इतकं कडक ऊन असूनही सामना होत नसेल तर जबाबदारी बीसीसीआयची असल्याचं मत क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. दरम्यान बीसीसीआयने विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर बंदी टाकली होती. या मैदानावर एक खासगी लीग खेळवली गेली होती. या लीगला बोर्डाची मान्यता नव्हती.
न्यूझीलंड: टिम साउदी (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, मॅट हेनरी, टॉम लॅथम (उपकर्णधार), डेरिल मिशेल, विल ओरूर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनर, बेन सीयर्स, केन विलियमसन, विल यंग
अफगानिस्तान: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रियाज हसन, अब्दुल मलिक, रहमत शाह, बहीर शाह महबूब, इकराम अली खिल (विकेटकीपर), शाहिदुल्लाह कमाल, अफसर जजाई (विकेटकीपर), अजमतुल्लाह ओमरजाई, जिया उर रहमान अकबर, शम्स उर रहमान, कैस अहमद, जहीर खान, निजात मसूद, खलील अहमद.