चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा टॉप फॉर्ममध्ये आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा जाडेजा चेन्नई सुपर किंग्ससाठी बॅटिंग आणि बॉलिंग दोघांमध्ये शानदार कामगिरी करतोय. रवींद्र जाडेजाने अलीकडेच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शानदार ऑलराऊंडर प्रदर्शन केलं होतं. ज्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. त्याशिवाय जाडेजा त्याच्या सोशल मीडिया reaction मुळे सुद्धा चर्चेत आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात CSK ने दिल्ली कॅपिटल्सवर 27 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर जाडेजाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. त्याला बॅटिंगबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने, “जर मी बॅटिंगसाठी वर आलो, तर लोक माही, माही म्हणून घोषणा देतील. मी लवकर आऊट व्हावं, म्हणून प्रार्थना करतील” एवढच बोलून जाडेजा हसायला लागला. ़
जाडेजाच्या एका लाइक नंतर हंगामा
जाडेजाच्या या वक्तव्या सोशल मीडियावर एका युजरने पोस्ट केलीय. “जाडेजा हे खूप हसून बोलतोय. पण आतून त्याला खूप त्रास होतोय. हे कुठल्या धक्क्यापेक्षा कमी नाही, असं मला वाटतं. जरा, विचार करा, तुमच्या टीमचे सपोटर तुमच्या पाठिशी नाहीयत. त्यांना तुम्हाला आऊट होताना पहायच आहे. तीन मॅन ऑफ द मॅच जिंकूनही तुमच्यावर टीका होते” महत्वाच म्हणजे जाडेजाने या टि्वटला लाइक केलय. त्यानंतर सोशल मीडियावर हंगमा सुरु आहे.
सीएसकेने कॅप्टन बनवलेलं
आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जाडेजाला सीएसकेने कॅप्टन म्हणून नियुक्त केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सीजनच्या मध्यमावर जाडेजाला टीमच्या कॅप्टनशिपवरुन हटवून पुन्हा धोनीकडे नेतृत्व दिलं. पॉइंट्स टेबलमध्ये सीएसके तळाला होती.
त्यानंतर जाडेजा सीएसकेपासून वेगळा होणार, आयपीएल 2023 मध्ये तो सीएसकेकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, पडद्यामागे बरच काही घडलं. रवींद्र जाडेजा अजूनही सीएसकेकडून खेळतोय.